पीसीसीओईमध्ये महिला सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न
Team My pune city – महाविद्यालयात शिकत ( PCCOE) असताना उत्तम करियर करण्याची स्वप्नं सर्व युवक, युवती पाहतात, मात्र ही स्वप्नपूर्ती होण्यासाठी प्रथम सर्वांनी आरोग्य जपले पाहिजे. आरोग्य म्हटले की शरीराचा, मनाचा, आत्म्याचा विचार मनात येतो. तसेच सामाजिक आरोग्य, भावनिक आरोग्य देखील महत्त्वाचे आहे असे मार्गदर्शन डॉ. सुप्रिया गुगळे यांनी केले.
Dighi Crime News: दिघी येथे दुकानातील वादातून तरुणाची हत्या, दोघे ताब्यात
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग (पीसीसीओई) मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सहयोगाने गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत आयोजित केलेल्या महिला सक्षमीकरण कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. गुगळे बोलत होत्या. यावेळी मानसिक आरोग्य प्रशिक्षक डॉ. मानसी सोंगगिरकर – बोराडे तसेच डॉ. जी. एन. कुलकर्णी, अधिष्ठाता डॉ. एस. यु. भंडारी, आयसीसीचे उपाध्यक्ष डॉ. व्हि. वाय. भालेराव आदी उपस्थित होते.
Golden Rotary : गोल्डन रोटरीच्या तिरंगा रॅली उत्स्फूर्त प्रतिसाद
डॉ. गुगळे यांनी सांगितले की, उत्तम आरोग्यासाठी नियमितपणे ( PCCOE) व्यायाम केला पाहिजे. तसेच डोळे, तळपाय, कानाची पाळी यांना हलक्या हाताने तेल लावून मसाज केला पाहिजे. निसर्गात फिरणे हे देखील लाभदायक असते. मानसिक आरोग्य प्रशिक्षक डॉ. मानसी सोंगीरकर बोराड यांनीही महिलांचे आरोग्य, जीवन संतुलन, निर्णय घेण्याची क्षमता या विषयावर मार्गदर्शन केले.
डॉ. वृषाली भालेराव यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ( PCCOE) होते.