Team MyPuneCity – पवना धरण परिसरात सुरुवातीपासूनच ( Pavana Dam) चांगल्या पावसाची नोंद होत असून, यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. आज सकाळी ६ वाजेपर्यंत धरण ४४ टक्के भरले असून, गतवर्षी याच कालावधीत हा साठा केवळ १९ टक्के होता.
आज (२१ जून २०२५) सकाळी धरणात एकूण १३६.७२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून, त्यापैकी १०५.५८ दशलक्ष घनमीटर इतका उपयोगी साठा आहे. ही साठ्याची टक्केवारी ४३.८०% इतकी झाली आहे.
तुलनात्मक दृष्टिकोनातून पाहता, मागील वर्षी याच ( Pavana Dam) दिवशी म्हणजे २१ जून २०२४ रोजी पवना धरणाची पातळी उपयोगी साठा ४६.०१ दशलक्ष घनमीटर इतकाच होता. पाणीसाठा फक्त १९.०९% भरलेला होता.
यंदा पावसाच्या बाबतीतही सुरुवात समाधानकारक झाली आहे. मागील २४ तासांत पवना परिसरात २७ मिमी पावसाची नोंद झाली असून, १ जूनपासून आतापर्यंत ५०६ मिमी पाऊस झाला आहे. गतवर्षी याच दिवशी एकूण फक्त १२४ मिमी पावसाची नोंद झाली होती.
Rashi Bhavishya 21 June 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
धरण सध्या ४४ टक्के भरले असले तरी पूर्ण क्षमतेसाठी आणखी पावसाची आवश्यकता आहे. शेतकरी, नागरी आणि औद्योगिक पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने आगामी काही आठवडे निर्णायक ( Pavana Dam) ठरणार आहेत.