Team My Pune City –पाषाण परिसरात एका अनोळखी व्यक्तीने “क्या अंकल” म्हणत ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला मिठी मारून त्यांच्या गळ्यातील तब्बल १ लाख २० हजार रुपयांची सोनसाखळी लांबविल्याची घटना समोर आली आहे. शहरात सलग दोन दिवसांत ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या अशा दोन घटना घडल्या आहेत.
याप्रकरणी पाषाण येथील ७० वर्षाच्या नागरिकाने बाणेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना पाषाण सुस रोडवरील साई चौक येथील फुटपाथवर रविवारी सकाळी साडे नऊ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,(Pashan) फिर्यादी ज्येष्ठ नागरिक फुटपाथवरून पायी जात असताना, दुचाकीवरून दोन जण त्यांच्याजवळ आले. एकाने त्यांच्या खांद्यावर हात ठेवत, ‘‘क्या अंकल किधर है, बहोत दिन हो गये मिले नही’’, असे बोलला. यावर ज्येष्ठाने ‘‘मै आपको जानता नही, आप कौन हो’’ असे उत्तर दिले. त्यानंतर दुचाकीवर बसलेल्या दुसरा चोर खाली उतरून ज्येष्ठाच्या पाया पडला. त्याला देखील ज्येष्ठाने ‘‘मेरे क्यू पैर पड रहे हो, मै आपको जानता नही’’ असे उत्तर दिले.
Vadgaon Maval: वारंगवाडी मध्ये किल्ले बनविण्याची स्पर्धा संपन्न
Jain Boarding Case : जैन बोर्डिंग प्रकरणात मोहोळ यांचं नाव विनाकारण ओढलं जातंय – देवेंद्र फडणवीस
त्यानंतर चोरांनी एक बिस्किटाचे पाकीट ज्येष्ठाच्या हातात देत तेथून जवळच असलेल्या एका मंदीरात दान करण्यास सांगितले. ज्येष्ठाने त्याला नकार देत, ‘‘तुम जाओ इधर से, मै नहीं करूंगा, आप ही मंदीर मे जाके दान करो,’’ असे उत्तर दिले. त्यानंतरही दोघा चोरट्यांनी ज्येष्ठाच्या हातात बिस्किटाचे पाकीट देत, ते सुतारवाडीच्या दिशेने निघून गेले. दरम्यान, चोरांनी हातचलाखीने आपल्या गळ्यातील १ लाख २० हजार रुपयांची सोन्याची चैन चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या प्रकरणी ज्येष्ठ नागरिकाने बाणेर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिस उपनिरीक्षक जाधव पुढील तपास करत आहेत.



















