Team My Pune City – धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर ( Parvati Deepotsav ) पर्वतीवर दीपोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले. शनिवारी पहाटे चार वाजल्यापासून पर्वती परिसर हजारो पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला. व्यायामासाठी दररोज पर्वतीवर येणाऱ्या पुणेकरांनीच या दीपोत्सवाचे आयोजन केले होते.
Accident : नवले पुलाजवळ दुचाकी घसरून ज्येष्ठाचा मृत्यू; पादचारी जखमी
पारंपरिक वेशभूषेत युवक-युवती, महिला आणि पुरुषांनी पहाटेच्या( Parvati Deepotsav ) शीतल वातावरणात पर्वतीवर उपस्थित राहून एकेक पणती लावली. लहान मुलांचाही उत्साह लक्षणीय होता. ‘जय श्रीराम’ च्या जयघोषात श्रीरामाची सामूहिक आरती करण्यात आली. नागरिकांनी एकमेकांचे फोटो टिपत दीपोत्सवाचे क्षण टिपले.
Sunil Shelke : सामाजिक उपक्रमांतून रोटरी सिटीचे काम कौतुकास्पद-आमदार सुनिल शेळके
मुख्य देवदेवेश्वर मंदिरासह श्री कार्तिकस्वामी, श्री विष्णू, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पेशवेकालीन संग्रहालय, श्रीमंत नानासाहेब पेशवे आणि बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्यांभोवती तसेच पर्वतीच्या प्रत्येक पायरीवर दिवे लावून संपूर्ण परिसर उजळवण्यात ( Parvati Deepotsav ) आला.
यंदा दीपोत्सवाचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला असून पर्वती दीपोत्सव समूहासह पर्वती ग्रुप, चाची ग्रुप, माऊली ग्रुप, तळजाई ग्रुप यांनी आयोजनात पुढाकार घेतला. काका पवार तालीम आंतरराष्ट्रीय संकुल, गोकुळ वस्ताद तालीम, शिवराम दादा तालीम, सह्याद्री संकुल, मामासाहेब मोहोळ संकुल आणि कात्रज येथील संस्थांनी विशेष सहकार्य केले.
पर्वती मंदिर परिसर आणि पायऱ्यांवर हजारो पणत्या लावण्यात आल्या. महत्त्वाच्या ठिकाणी रांगोळ्यांनी सजावट करण्यात आली. व्यायामासाठी येणाऱ्या पुणेकरांनी दीपोत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पर्वतीच्या सांस्कृतिक वैभवात भर ( Parvati Deepotsav ) घातली.