Team My Pune City – वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणात ( Parth Pawar Land Case) उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यासमोर नवी अडचण निर्माण झाली आहे. अजित पवार यांनी हा जमीन व्यवहार रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने (Amedia Company) व्यवहार रद्द करण्यासाठी नोंदणी कार्यालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, आता या व्यवहाराच्या रद्द प्रक्रियेसाठी कंपनीला तब्बल 21 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरावे लागेल, अशी अट सह-दुय्यम निबंधक कार्यालयाने घातली आहे.
Today’s Horoscope, Saturday : आजचे राशीभविष्य – शनिवार, ८ नोव्हेंबर २०२५
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 300 कोटी रुपयांच्या या व्यवहारावर ५ टक्के मुद्रांक शुल्क, १ टक्का स्थानिक संस्था कर आणि १ टक्का मेट्रो कर — अशा एकूण ७ टक्के दराने कर आकारला जाणार आहे. त्यानुसार, व्यवहार रद्द करण्यापूर्वी 21 कोटी रुपयांची रक्कम जमा करणे बंधनकारक असेल, असे निबंधक कार्यालयाने स्पष्ट केले ( Parth Pawar Land Case) आहे.
पूर्वी या जमिनीवर आयटी पार्क उभारण्याच्या उद्देशाने मुद्रांक शुल्कातील सवलत देण्यात आली होती. मात्र, आता तो प्रकल्प राबवला जाणार नसल्याने ती सवलत लागू राहणार नाही, असे कार्यालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे व्यवहार रद्द करण्यासाठी नव्याने शुल्क भरणे अनिवार्य ठरले ( Parth Pawar Land Case) आहे.
Vadgaon Nagar Panchayat : वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी २४ मतदान केंद्रांची तयारी पूर्ण
या निर्णयामुळे पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीची अडचण वाढली असून, व्यवहारातून सुटका करण्यासाठी मोठी आर्थिक जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे. सध्या नोंदणी कार्यालय आणि अमेडिया कंपनी यांच्यात या प्रक्रियेबाबत पत्रव्यवहार सुरू ( Parth Pawar Land Case) आहे.






















