Team My Pune City – कोरेगाव पार्कमधील जमीन गैरव्यवहारानंतर( Parth Pawar Land Case) आता बोपोडीतील सरकारी जमिनीच्या अपहारप्रकरणी आणखी एक गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यासह नऊ जणांविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नायब तहसीलदार प्रविणा शशिकांत बोर्डे (वय ५०) यांनी शासनाकडून प्राधिकृत अधिकारी म्हणून तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, १२ फेब्रुवारी २०२४ ते १ जुलै २०२५ या कालावधीत शहर मामलेदार कचेरीत नियुक्त असलेले तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी अधिकारपदाचा गैरवापर करून बेकायदेशीर आदेश व पत्र तयार केले.( Parth Pawar Land Case)
जमीन अपहाराचा आरोप
बोपोडी येथील ५ हेक्टर ३५ आर जमीन १८८३ पासून कृषी विभागाच्या ताब्यात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट आदेश दिले होते की ही जमीन शासनाच्या मालकीची आहे. तरीही, व्हिजन प्रॉपर्टी व इतर अर्जदारांशी संगनमत करून या जमिनीवर खोटा मालकी हक्क दाखविण्याचा प्रयत्न झाला. शासनाची फसवणूक करून जमीन अपहार करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. ( Parth Pawar Land Case)
आरोपींची यादी
या प्रकरणात खालील व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे :
- तहसीलदार सूर्यकांत येवले
- राजेंद्र रामचंद्र विद्वांस
- ऋषिकेश माधव विद्वांस
- मंगल माधव विद्वांस
- विद्यानंद अविनाश पुराणिक (इंदूर, मध्य प्रदेश)
- जयश्री संजय एकबोटे (मुंबई)
- शीतल किसनचंद तेजवानी
- दिग्विजय अमरसिंह पाटील (अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी संचालक)
- हेमंत गवंडे (अर्जदार)
पुढील तपास
या गुन्ह्यामुळे पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग्ज कंपनीशी संबंधित जमीन व्यवहारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून या व्यवहारातील राजकीय व प्रशासकीय संगनमत उघड होण्याची शक्यता व्यक्त केली ( Parth Pawar Land Case) जात आहे.


















