situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pankaja Munde: विकासक आणि वास्तुविशारदांनी ग्रीन अँड नेट झिरो बिल्डिंग संकल्पना स्वीकाराव्यात – पंकजा मुंडे

Published On:

Team MyPuneCity – रिअल इस्टेट डेव्हलपर्स आणि वास्तुविशारदांनी नवीन प्रकल्पांचे नियोजन करताना ‘ग्रीन अँड नेट झिरो बिल्डिंग’ संकल्पना स्वीकाराव्यात. कारण पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे, असे आवाहन पर्यावरण, हवामान बदल आणि पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. तसेच बांधकाम व्यावसाईकांनी त्यांच्या प्रकल्पांमध्ये शाश्वत, पर्यावरणपूरक संकल्पना आणि तंत्रज्ञान एकत्रित करण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी प्रीफॅब्रिकेटेड तंत्रज्ञानाचे उदाहरण देत ते धूळ, मोडतोड आणि बांधकाम कचरा कमी करून साइटवरील प्रदूषण कसे लक्षणीयरीत्या कमी करते हे सांगितले.

त्या सीआयआय इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (आयजीबीसी) पुणे चॅप्टरने आयोजित केलेल्या ‘ग्रीन पुणे समिट आणि अभिनंदन २०२५’ दरम्यान बोलत होत्या. या शिखर परिषदेच्या उदघाटनाला पद्मश्री पुणे इंटरनॅशनल सेंटरचे संस्थापक सदस्य श्री. अमिताव मल्लिक, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडचे सीईओ श्री. राहुल सहाय, सीआयआय – आयजीबीसीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. सी. शेखर रेड्डी; आयजीबीसी पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा डॉ. पूर्वा केसकर; आणि आयजीबीसी पुणे चॅप्टरचे सह-अध्यक्ष श्री. हृषीकेश मांजरेकर उपस्थित होते.

Pune : गानवर्धनतर्फे नेहा महाजन यांचा कै. सुचेता नातू स्मृती युवा सतारवादक पुरस्काराने गौरव

पुढे बोलताना मुंडे म्हणाल्या, बांधकाम उपक्रमांमध्ये पर्यावरणपूरक उपाययोजना लागू करण्यासाठी सरकारकडून नवीन नियम तयार केले जात आहेत. विशेषतः सांडपाणी प्रक्रिया नियमांमध्ये नवीन नियम येत आहेत, असे ही त्यांनी नमूद केले. त्यांनी आयजीबीसी भागधारकांकडून धोरण ठरवताना केलेल्या शिफारशी आणि सूचनांचे स्वागत केले. तसेच ही ऐतिहासिक शिखर परिषद सार्वजनिक आणि खाजगी भागधारकांसाठी पुणे हे भारतासाठी हिरवे मॉडेल शहर बनवण्यासाठी अंतर्दृष्टी आणि धोरणे सामायिक करण्यासाठी एक अभिसरण बिंदू म्हणून काम करेल, असा विश्वास व्यक्त केला.

आयजीबीसी पुणे चॅप्टरचे सह-अध्यक्ष श्री. हृषिकेश मांजरेकर यांनी आयजीबीसी-प्रमाणित हरित इमारती, सरकारचे प्रोत्साहनात्मक धोरणे त्याचबरोबर पर्यावरणपूरक पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूकीतील वाढीमुळे शाश्वत शहरी विकासात पुणे हे एक आघाडीचे शहर म्हणून कसे उदयास येत आहे, हे यावेळी स्पष्ट केले. सुधारित रस्त्यांचे जाळे आणि सर्वसमावेशक उपजीविका योजना यासारखे उपक्रम हवामान-स्नेही वाढीबाबत पुण्याची वचनबद्धता दाखवून देते.

आर्थिक दृष्टिकोनातून, या हरित इमारतींचे भाडेपट्टा/भाडेपट्टा दर ४-७ ट्क्यांनी अधिक आहे. तसेच त्यांचा ताबा जलद मिळतो. त्यामुळे गुंतवणूकदारांकडून या इमारतींना पसंती मिळते. आयजीबीसी उपक्रम पुण्याच्या हवामान क़ृती आऱाखड्याशी अतिशय मिळताजुळता आहे. विशेषतः ऊर्जा कार्यक्षमता, कचरा व्यवस्थापन आणि २०५० पर्यंत कार्बन-पॉझिटिव्ह दर्जा साध्य करण्याच्या उद्दिष्टांना तो पाठबळ देतो.

पुण्याच्या शाश्वत विकासाला इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (IGBC) ग्रीन सिटीड रेटींग्ज सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून सक्रियपणे प्रोत्साहन देत आहे. हे उपक्रम पर्यावरणपूरक शहरी नियोजनाला प्रोत्साहन देत आहेत. तसेच पुणे चॅप्टरच्या कार्यशाळा आणि विविध कार्यक्रमांद्वारे स्थानिक विकसक आणि वास्तुविशारदांना हरित इमारतीच्या पद्धतींबद्दल शिक्षित करत आहे. पुण्यातील उल्लेखनीय IGBC-प्रमाणित प्रकल्पांमध्ये ISC टॉवर पुणे, अमर टेक पार्क आणि राजश्री इस्टेट यांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पांनी ऊर्जा-कार्यक्षम आणि शाश्वत डिझाइनसाठी प्लॅटिनम रेटिंग प्राप्त केलेले आहे.

“द ग्रीन डायलॉग: ब्रेकिंग बॅरियर्स अँड बिल्डिंग सोल्युशन्स” या संकल्पनेलवरील आधारित आगळ्यावेगळ्या सत्रात महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल, पशुसंवर्धन मंत्री माननीय पंकजा मुंडे यांनी आयजीबीसी पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा डॉ. पूर्वा केसकर यांच्याशी संवाद साधला. या सत्रात महाराष्ट्राचे पर्यावरण धोरण, शहरी भारतातील हरित संक्रमणाची आव्हाने आणि जागतिक हवामान उद्दिष्टांशी स्थानिक कृतींचा ताळमेळ घडविण्याचे महत्त्व आदी मुद्दांवर लक्षवेधी चर्चा करण्यात आली.

Pune: धनंजय मुंडे यांनी योग्य पर्याय निवडला, त्यांना मनःशांती मिळेल- पंकजा मुंडे

या लक्षवेधी चर्चेत सहभागी होताना आयजीबीसी पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा डॉ. पूर्वा केसकर म्हणाल्या, ” भारताच्या हरित इमारत चळवळीत पुणे शहर आघाडीवर आहे. ते जलद शहरी विकास आणि शाश्वततेकडे जाणीवपूर्वक होत असलेला बदल यांचा मिलाफ घडवत आहे. मेट्रो पायाभूत सुविधांच्या सुरुवातीसह आणि नाविन्यपूर्णतेच्या सक्षम संस्कृतीसह, पुणे शहर आता हवामान-लवचिक विकासासाठी मापदंड तयार करत आहे. तरुणाईमध्ये आपल्याला दिसणारा उत्साह, पुण्यातील आमचे आयजीबीसी विद्यार्थी चॅप्टर, जागरूकतेसाठी राबविल्या जात असलेल्या मोहिमा आणि नानाविध कार्यक्रम भविष्यात उदयास येणाऱ्या हरित नेतृत्व घटकांना सक्षम करत आहेत. त्यांची ऊर्जा तसेच उद्योगांच्या बांधिलकीमुळे तयार झालेले हे प्रारुप (मॉडेल) हरित शहर बनण्याच्या पुण्याच्या प्रवासाला बळ मिळत चालले आहे.”

तांत्रिक सत्रात, तज्ज्ञांनी शाश्वत बांधकामातील सर्वोत्तम पद्धती आणि भविष्यात येत असलेले तंत्रज्ञान यावर प्रकाश टाकला. आयजीबीसी अहमदाबाद चॅप्टरचे अध्यक्ष आणि आयएनआय ग्रुपचे सीएमडी श्री जयेश हरियाणी यांनी समग्र आणि विशिष्ट डिझाइन पर्याय याबाबत माहिती दिली. त्यानंतर गुजरात गार्डियन आणि शिंडलर इंडियासह आघाडीच्या कंपन्यांनी तांत्रिक सादरीकरणे सादर केली. त्यात ऊर्जा-कार्यक्षम काच आणि उभ्या स्वरुपातील गतिशीलता प्रणालींमधील नावीन्यपूर्णतेवर प्रकाश टाकला.

“रिअल इस्टेट क्षेत्रावर लक्ष केंद्रित असलेल्या शहरांसाठी हवामान कृती योजना” या विषयावरील विचारप्रवर्तक पॅनेल चर्चेने या शिखर परिषदेचा समारोप झाला. प्रिन्सिपल आर्किटेक्ट सुश्री प्रितिका मांजरेकर यांनी सूत्रसंचालन केले.

मोको डिझाईन स्टुडिओच्या पॅनेलमध्ये पंचशील रिअॅल्टीचे संचालक – ऑपरेशन्स श्री आनंद संघवी; एनआययूएचे धोरण आणि नियोजन प्रमुख श्री अंशुल अब्बासी; आणि पुणे महापालिकेचे आर्किटेक्ट आणि अर्बन प्लॅनर श्री. निखिल मिजार हे प्रमुख म्हणून सहभागी झाले होते.

या चर्चेत हवामान-प्रतिसाद आधारित वास्तुकला, ग्रीन इमारतींसाठी वित्तपुरवठा आणि शाश्वत शहरी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणात्मक सुधारणांची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.

या कार्यक्रमादरम्यान, भारतातील हरित इमारतींच्या निर्मितीमध्ये पुण्याच्या योगदानाची दखल घेऊन, अनेक आयजीबीसी-प्रमाणित प्रकल्पांना सन्मानित करण्यात आले. हे पुरस्कार महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल, पशुसंवर्धन मंत्री माननीय पंकजा मुंडे; पुणे जिल्हाधिकारी श्री जितेंद्र दुडी (आयएएस) आणि सीआयआय – आयजीबीसीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री सी शेखर रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

Follow Us On