Team MyPuneCity – पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख (Pankaj Deshmukh) यांची पुणे शहरातील अप्पर पोलीस आयुक्तपदी पदोन्नती करण्यात आली आहे. राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या निर्णयानुसार, राज्यातील एकूण 14 पोलीस अधीक्षकांना उपमहानिरीक्षक या वरिष्ठ पदावर बढती देण्यात आली असून त्यात पंकज देशमुख यांचा समावेश आहे.
देशमुख हे सध्या पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक (Pankaj Deshmukh) म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकुशलतेच्या आणि नेतृत्वगुणांच्या आधारावर त्यांची निवड पुणे शहरातील महत्त्वाच्या पदावर करण्यात आली आहे. शहरातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ही नेमणूक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
Dehu Mishap : इंद्रायणी नदीत तेरा वर्षीय मुलगा बुडाला
या यादीत आयपीएस मोक्षदा पाटील यांनाही पोलीस उपमहानिरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली आहे. त्या सध्या राज्य राखीव पोलीस बल गटाच्या समादेशक पदावर कार्यरत होत्या. तसेच, रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची बदली मुंबईच्या विशेष शाखेतील अप्पर पोलीस आयुक्तपदी करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीणचे विक्रम देशमाने यांचीही नियुक्ती मुंबईतील मध्य प्रादेशिक विभागाच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी करण्यात आली आहे.
पदोन्नती मिळालेल्या 14 अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे :
पंकज देशमुख (Pankaj Deshmukh), मोक्षदा पाटील, धनंजय कुलकर्णी, विक्रम देशमाने, प्रसाद अक्कानवरु, अमोघ गावकर, जी. श्रीधर, राकेस कलासागर, प्रियंका नारनवरे, अरविंद साळवे, सुरेश कुमार मेंगडे, विजय मगर, राजेश बनसोडे आणि राजेंद्र दाभाडे.
या अधिकाऱ्यांना “पोलीस उपमहानिरीक्षक” श्रेणीतील बढती महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 22 नुसार देण्यात आली आहे. शासनाचे सचिव व्यंकटेश भट यांच्या सहीने ही पदोन्नती अधिकृत करण्यात आली आहे.