Team MyPuneCity – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील ( Pandharpur Wari) आज दुसरे रिंगण खडूस फाटा येथे पार पडले. मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात माऊलींच्या अश्वांचा दुसरा नेत्रदीपक गोल रिंगण सोहळा माऊलीं माऊलींच्या जयघोषात आज सकाळी पार पडला.

माळशिरस येथील मुक्काम आटोपून आज सकाळी माऊलींच्या पालखी सोहळ्याचे वेळापूरच्या दिशेने मार्गक्रमण झाले असताना वाटेत खुडूस फाटा येथे दुसरा गोल रिंगण सोहळा पार पडला. अश्व दौड करतात त्या ठिकाणी रांगोळ्यांची सुंदर पायघडी घालण्यात आली ( Pandharpur Wari) होती. पुष्पांच्या पाकळ्यांनी रिंगण सजवण्यात आले होते.
Pavana Dam : पवना धरण ६३ टक्के भरले; मागील वर्षीच्या तुलनेत साठ्यात तब्बल तिपटीने वाढ
अश्वांनी फेऱ्या पूर्ण करताच अश्व धावत असलेल्या ठिकाणची धूळ वारकरी भाविकांनी आपल्या मस्तकी लावली. रिंगण सोहळा पार पडताच अवघा आसमंत माऊलींच्या नामघोषाने दुमदुमला. टाळ मृदंगाच्या गजरात मानवी मनोरे करत होते , वारकरी फुगडी खेळत होते, तर कोणी हरी भजनात दंग होत आनंदाने नृत्य करत होते.आजचा दुपारचा विसावा विंझोरी ज्ञानेश्वर नगर तदनंतर धावाबावी माउंट येथे होणार आहे.
आज दि.२ रोजी वेळापूर येथे रात्री सोहळा मुक्कामी असेल.उद्या सकाळी पालखी सोहळा वेळापूर हून भंडीशेगाव कडे मार्गस्थ होईल.हे मार्गक्रमण करत असताना उद्या सकाळी ठाकूर बुवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण सोहळा पार पडेल. संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव यांचा बंधूभेटीचा ( Pandharpur Wari) सोहळा पार पडेल.