Team MyPuneCity – पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या माऊलींच्या पालखी सोहळ्याचे बैल दिवे घाट सर करताना उधळले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर ( Palkhi Sohala) व्हायरल झाला आहे.
दिवे घाट पार केल्यानंतर सासवड जवळ अचानक माऊलींच्या पालखीचे बैल गर्दीमुळे उधळले. सासवडच्या जवळ माऊलीची पालखी विसाव्याला थांबली होती. त्यावेळी गर्दीमुळे एक बैल उधळला. दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली होती, याचा व्हिडिओ आता समोर ( Palkhi Sohala) आला आहे.
पालखी सोहळ्यात अचानक बैल उधळल्यामुळे वारकरी आणि नागरिकांची धावपळ उडाली. थोड्या वेळासाठी पालखीमध्ये भीतीचे वातावरण होते, पण त्या बैलाला कंट्रोल केल्यानंतर वातावरण शांत झाले.
या घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती मिळाली आहे. दिवे घाट सर करण्यासाठी माऊलींच्या रथाला चार ते पाच बैले जोड्या होत्या. त्यामधील एक बैल गर्दी पाहून उधळला अन् गोंधळ उडाला होता. वेळीच बैलावर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठी दुर्घटना ( Palkhi Sohala) टळली.