Team My Pune City – सालाबाद प्रमाणे यंदाच्या( Paigamber Jayanti) वर्षीही हजरत महंमद पैगंबर यांची जयंती जगभराप्रमाणे पुणे शहरांमध्ये देखील मोठ्या उत्साहाने मुस्लिम समाजबांधवांच्या वतीने साजरी करण्यात येणार आहे. यंदाची वर्ष हे १५०० वे जयंती वर्ष असल्यामुळे यावर्षी अधिक उत्साहाने व धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करून साजरी केली जाणार आहे.
यंदाची जयंती ही 5 सप्टेंबरला गणेश विसर्जनाच्या पूर्वदिनी येत ( Paigamber Jayanti) असल्यामुळे धार्मिक सलोखा जपत यापूर्वीच ही जयंती सोमवार दिनांक 8 सप्टेंबरला साजरी करण्याबाबतचा निर्णय सिरत कमिटीच्या वतीने मुस्लिम समाजाच्या तर्फे घेण्यात आला आहे , मुस्लिम समाजाच्या या निर्णयाचे राज्य शासन व सर्व स्तरावर कौतुक करण्यात आले होते.
पैगंबार जयंतीच्या अनुषंगाने आज मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये उपस्थित शासकीय निमशासकीय प्रतिनिधींच्या वतीने उत्सवांमध्ये अधिक सहभाग दर्शविण्यासाठी राज्य शासन व केंद्र शासनाच्या वतीने दरवर्षी हजरत महंमद पैगंबर जयंती दिवशी देण्यात येणारी शासकीय सुट्टी ८ सप्टेंबर रोजी देण्यात यावी अशी मागणी सिरत कमिटीचे वतिने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पुणे जिल्हाधिकारी डॉ जितेंद्र डुड्डी यांच्याकडे करण्यात( Paigamber Jayanti) आलेली आहे.
मौलाना जमिरुद्दीन , मौलाना निझामुद्दीन , रफिउद्दीन शेख , सिराज बागवान , आतिक खान उस्ताद , आसिफ शेख , नदीम मुजावर , जावेद खान, जावेद शेख , गुलाम अहमद कादरी आदी मान्यवरांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेवुन निवेदन सादर केले.
राज्य सरकारने मुंबई आणि उपनगर साठी 8 सप्टेंबर रोजी सुट्टी असेल असे जाहीर केले आहे, तसेच आमच्या मागणीचा सकारात्मक विचार करून पुणे शहरात सुद्धा 8 सप्टेंबरला शासकीय सुट्टी जाहीर करेल असा विश्वास सिरत कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला ( Paigamber Jayanti) आहे. यावेळी खालील मान्यवर उपस्थित होते.