situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Operation Sindoor : लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पत्रकार परिषदेत पुराव्यासह सांगितले ‘ ऑपरेशन सिंदूर’ कसे राबिवले

Published On:
Operation Sindoor
---Advertisement---

Team MyPuneCity – जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला ( Operation Sindoor ) झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय सेनेनं बदला घेतला आहे.  पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम फत्ते केली आहे. लष्काराच्यावतीने सकाळी साडेदहा वाजता पत्रकार परिषद घेऊन अधिकृत माहिती देण्यात आली.

Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताची मोठी प्रत्युत्तरात्मक कारवाई; पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले

पत्रकार परिषदेचे मुद्दे-

१. २२ एप्रिलला पहलगाममध्ये भारतीय पर्यटकांवर दहशतवाद्यांनी ( Operation Sindoor )हल्ला केला. २५ भारतीय व एका नेपाळी नागरिकाची हत्या करण्यात आली. मुंबई हल्ल्यांनंतर हा भारतात झालेल्या कोणत्याही दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या सामान्य नागरिकांच्या संख्येच्या दृष्टीने सगळ्यात भीषण घटना होती. पहलगाम हल्ला अत्यंत क्रूर होता लोकांना त्यांच्या कुटुंबीयांच्या समोर डोक्यात गोळ्या घातल्या शिवाय कुटुंबीयांना सांगण्यात आलं की ,तुम्ही परत जाऊन या हल्ल्याबाबत सगळ्यांना सांगा.

२.हल्ला करणारा गट लष्कर ए तोयबाशी संबंधित होता. पहलगाम हल्ल्यातील संदर्भानुसार पाकिस्तानचे दहशतवाद्यांशी संबंध उघड झाले आहेत. प्रत्यक्षदर्शी व तपास यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. हा कट रचणा-यांचीही माहिती ( Operation Sindoor )मिळाली आहे .

Maval : डोंगरावर फिरायला गेलेल्या चौघांवर मधमाश्यांचा हल्ला; एकाचा मृत्यू, दोघे जखमी

३.आज भारतानं ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवादी हल्ल्यांना उत्तर दिले आहे. ते थांबवण्यासाठी आपल्या अधिकारांचा वापर केला आहे. ही कारवाई नियोजित, केंद्रीत होती. भारतात पाठवल्या जाणाऱ्या संभाव्य दहशतवाद्यांना रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.

४. पत्रकार परिषदेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सांगितले की, १ वाजून ५ मिनिटांपासून दीड वाजेपर्यंत लष्कराकडून ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आले. २२ एप्रिलला पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृत नागरिक व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी हे ऑपरेशन राबवलं गेले. यात ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. ( Operation Sindoor )

५. पाकिस्तानात गेल्या ३ दशकांमध्ये दहशतवाद पसरवण्यासाठीची व्यवस्था उभारली गेली. यात रिक्रूटमेंट, प्रशिक्षण सुविधा व लाँच पेंड यांचा समावेश होता. पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये हे तळ पसरलेले आहेत

६. सवाईनाला ते भागलपूरपर्यंत दहशतवादी तळ पसरलेले होते. गुप्तचर माहितीच्या आधारे हे स्वरुप निश्चित करण्यात आले. त्यातून सामान्य नागरिकांना व निवासी भागांचं नुकसान होणार नाही याची यावेळी काळजी घेतली गेली .

सगळ्यात आधी सवाईनाला कॅम्प मुझफ्फराबाद हा तळ पाकव्याप्त काश्मीरम्सये सीमेपासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. इथूनच काही हल्ल्यांमधील दहशतवाद्यांना प्रशिक्षण मिळाले होते.

सय्यदना बिलाल कॅम्प मुझफ्फराबाद हा जैश ए मोहम्मदचा तळ आहे. इथे दहशतवादी हत्यारे आणि दारूगोळा ठेवत होते.

गुरुपूर कॅम्प, कोटली- हा एलओसीपासून ३० किलोमीटर दूर होता. लश्कर ए त्यबाचा कॅम्प होता. राजौरी आणि पूंछमध्ये या कॅम्पमधून प्रशिक्षण घेतलेल्या दहशतवाद्यांकडून कारवाया करण्यात आल्या होत्या.

बरनाला कॅम्प भिमबर हा एलओसीपासून ९ किमी लांब आहे . इथे हत्यार आईडी यांचे प्रशिक्षण दहशतवाद्यांना दिलं जात होत. ( Operation Sindoor )

सर्जल कॅम्प सियालकोट हा आंतरराष्ट्रीय सीमेपासून ६ किमी अंतरावर आहे.

मेहमुला जापा कॅम्प, सिपालकोट हा १८ ते १२ कमी आतरराष्ट्रीय सीमेपासून लांब होता. हा हिजबुल मुजाहिद्दीनचा कॅम्प होता. कठवा जम्मूमध्ये दहशत पसरवण्यासाठीचं केंद्र होत पठाणकोट एअर बेसवर झालेला हल्ला याच कॅम्पमध्ये आखण्यात आला होता

मरकस ताएबा मुरीदके हा आंतरराष्ट्रीय सीमेपासून १८ ते २५ किमी लांब आहे. २००८ च्या मुंबई हल्ल्याचे दहशतवादी इथेच प्रशिक्षित झाला होता. अजमल कसाब व डेविड इंडलीताही इथेच प्रशिक्षण दिलं गेलं होतं.

मस्कझ सुभान अल्लाह, भागलपूर हा तळ आंतरराष्ट्रीय सीमारेषेपासून १०० किमी लांब आहे. हे जैश ए मोहम्मदचं मुख्यालय होतं .इथे रिक्रूटमेंट, प्रशिक्षण दिलं जात होतं.

Follow Us On