Team My Pune City – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट मनुष्यबळ व्यवस्थापकांच्या ( NIPM) राष्ट्रीय पातळीवरील संस्थेच्या द्वैवार्षिक निवडणुकीमध्ये पुण्यातील तीन जणांची निवड झाली आहे.
या निवडणुकीत पी.आर. बसवराजु यांच्या नेतृत्वातील पॅनलने ( NIPM) घवघवीत यश मिळवून सर्वच्या सर्व जागांवरती विजय संपादन केला आहे. एनआयपीएमच्या पुणे चॅप्टर मधून अमृता तेंडुलकर या राष्ट्रीय खजिनदारपदी निवडणून आल्या असून नरेंद्र पाटील हे पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी निवडून आले आहेत. तर एनआयपीएमच्या पिंपरी चिंचवड चाकण चॅप्टरचे अभय खुरसाळे हे पश्चिम विभागाचे सदस्य म्हणून राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये नेतृत्व करताना दिसणार आहेत.
PMPML : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पीएमपीएमएलचे विशेष बस नियोजन
एनआयपीएमच्या 2025- 27 च्या राष्ट्रीय कार्यकारणीचे ( NIPM) अध्यक्ष म्हणून पी.आर. बसवराजु निवडून आले असून उर्वरित कार्यकारणी पुढील प्रमाणे आहे. बी. मुरलीधर राव उपाध्यक्ष,डॉ. विश्वभूषण बेहरा सरचिटणीस, रॉबर्ट कुटीन्हा अतिरिक्त सरचिटणीस,एलेंगो पी. दक्षिण विभाग उपाध्यक्ष, संजय ठाकूर, पूर्व विभाग उपाध्यक्ष, सुहास बिरेवार मध्य विभाग उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडताना दिसणार आहेत.
एनआयपीएम ही संस्था राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ( NIPM) एच आर क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासाठी अविरत कार्यरत आहे. या संस्थेत भारतातील विविध औद्योगिक कंपन्यांचे ४० हजारांहून अधिक मनुष्यबळ व्यवस्थापक सभासद आहेत.
कोलकाता येथे या संस्थेचे राष्ट्रीय मुख्यालय असून देशभरातील ५६ शाखांमध्ये संस्थेचा ( NIPM) कार्यविस्तार आहे.