situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Nilesh Ghaywal : पुण्यातील युवकावर गोळीबार करणारा निलेश घायवळ स्वित्झर्लंडला फरार

Published On:

मावळ ऑनलाईन – कोथरूड परिसरात १७ सप्टेंबर रोजी ( Nilesh Ghaywal ) तरुणावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील फरार गॅंगस्टर निलेश घायवळ हा थेट स्वित्झर्लंडमध्ये पळाल्याचे उघड झाले आहे. त्याने ९० दिवसांच्या व्हिसावर हा प्रवास केला असून, अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे राहत असताना बनावट कागदपत्रांद्वारे पासपोर्ट काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी ही बाब पुष्टी केली असून, यामध्ये सहभागी असणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाईचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. तसेच, घायवाल देशाबाहेर निसटू नये यासाठी लूकआऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे.

12 th Exam : बारावीच्या अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ : दहावी-बारावी खासगी अर्ज व परीक्षा केंद्र प्रस्तावांनाही दिलासा

कोथरूड येथे १७ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या ( Nilesh Ghaywal ) सुमारास एक तरुण मित्रासोबत गप्पा मारत उभा असताना घायवळ टोळीने त्याच्यावर गोळीबार केला. या प्रकरणात पोलिसांनी मयूर कुंबरे, रोहित आखडे, गणेश राऊत, मयंक उर्फ मॉंटी व्यास, आनंद चांडलेकर उर्फ अंड्या व दिनेश फाटक या सहा जणांना अटक केली होती. मात्र मुख्य सूत्रधार निलेश घायवळ पळ काढण्यात यशस्वी झाला होता. घटनेनंतर गुन्हे शाखेने तपास सुरू करून या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लावण्यात आला आहे. “संबंधित आरोपींवर निश्चित कठोर कारवाई केली जाईल,” असे आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

Talegaon Dabhade News : सुसंस्कारित विद्यार्थी, आदर्श समाज घडविण्याचे महत्त्वाचे कार्य शिक्षक करतात- बाळा भेगडे

दरम्यान, घायवळवर कोथरूड पोलिस ठाण्यात ( Nilesh Ghaywal ) आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्या कारचा क्रमांक घायवालने आपल्या दुचाकीवर बेकायदेशीररीत्या वापरला होता. पोलिसांच्या चौकशीत ही दुचाकी घायवालचीच असल्याचे स्पष्ट झाले. या संदर्भात झोन ३ चे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी माहिती दिली.

जामखेड (अहमदनगर) येथील रहिवासी असलेला घायवळ हा गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे पुण्यात दाखल असलेला कुख्यात गुंड आहे. अटकेपासून बचाव करण्यासाठीच त्याने परदेशात पलायन केल्याचा पोलिसांचा संशय ( Nilesh Ghaywal ) आहे.

Follow Us On