Team My Pune City – कोथरूड गोळीबार प्रकरणातील ( Nilesh Ghaywal Case)पसार झालेला गुंड नीलेश घायवळ हा युरोपात असल्याची माहिती समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याच्याविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस बजावली आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना (इंटरपोल) यांच्याशी संपर्क साधला आहे, अशी माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.
तपासात उघड झाले आहे की, घायवळने बनावट कागदपत्रांच्या आधारे पारपत्र मिळवून परदेश गाठला. त्याचा भाऊ सबिन घायवळ याच्याविरुद्ध नुकतीच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तर दुसरा भाऊ सचिन घायवळ अद्याप फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
नीलेश घायवळविरुद्ध यापूर्वी रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी पोलिसांनी ब्लू कॉर्नर नोटीस बजावली. इंटरपोलला पत्र पाठवून ही कारवाई करण्यात आली आहे. ( Nilesh Ghaywal Case)
घायवळने ‘घायवळ’ऐवजी ‘गयावळ’ या नावाने बनावट कागदपत्रांच्या आधारे पारपत्र मिळवले. अहिल्यानगर येथून त्याने ‘तत्काळ’ पारपत्र घेतले होते. तपासात समोर आले आहे की, तो ९० दिवसांच्या व्हिसावर स्वित्झर्लंडला गेला आहे.
Prashant Bhagwat : विकास, समाजकार्य आणि जनसंपर्क यांचा अद्भुत संगम म्हणजे प्रशांत दादा भागवत
आतापर्यंत नीलेश घायवळविरुद्ध पाच गुन्हे नोंदवले गेले असून, बनावट पारपत्र प्रकरणीही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आता त्याला ताब्यात ( Nilesh Ghaywal Case) घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करत आहेत.