situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Nilesh Chavan : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून नेपाळ बॉर्डरवरून अटक

Published On:
Nilesh Chavan

Team MyPuneCity – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेला निलेश चव्हाण अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या चव्हाणला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नेपाळ सीमेवरून अटक ( Nilesh Chavan) केली आहे. या अटकेमुळे संपूर्ण प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे.

वैष्णवी हगवणे हिने १६ मे रोजी आत्महत्या केली होती. या आत्महत्येमागे हुंड्याच्या मागणी संबंधित मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप तिच्या सासरच्या लोकांवर करण्यात आला होता. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या नऊ महिन्याच्या मुलाला निलेश चव्हाण याने नेले होते. वैष्णवी हिच्या माहेरच्या लोकांनी तिच्या मुलाच्या ताब्यासाठी चव्हाण याच्या कर्वे नगर, पुणे येथील घरी गेल्यावर, चव्हाणने बंदुकीचा धाक दाखवून त्यांना धमकावले, अशी तक्रार वारजे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

Khadki : डॉ. पी. एस. आगरवाल यांचे निधन

या प्रकरणी चव्हाणविरुद्ध भारतीय न्याय संहिता, शस्त्र अधिनियम आणि बाल न्याय (बालकांची काळजी व संरक्षण) अधिनियम अंतर्गत विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी त्याच्या कार्यालय आणि घरी छापे टाकून त्याचा लॅपटॉप जप्त केला होता. निलेश चव्हाण याचा पूर्व इतिहास देखील वादग्रस्त राहिला आहे. २०१९ मध्ये त्याच्यावर विविध गंभीर गुन्हे दाखल ( Nilesh Chavan) आहेत.

पोलिसांकडून निलेश चव्हाणच्या अटकेसाठी सहा विशेष पथके तयार करण्यात आली होती. तसेच, त्याच्या शोधासाठी लुकआउट नोटीसही जारी करण्यात आली होती. पुणे पोलिसांनी त्याच्या शस्त्र परवान्याच्या रद्दबातल करण्यासाठीही प्रस्ताव सादर केला होता. दरम्यान, चव्हाणला पकडल्याचा खोटा दावा करून पोलिसांना दिशाभूल करणाऱ्या एका व्यक्ती विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या साऱ्या घडामोडीनंतर अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठी कामगिरी करत निलेश चव्हाणला नेपाळ सीमेवरून अटक केली आहे. त्याला लवकरच पिंपरी-चिंचवड शहरात आणले जाणार ( Nilesh Chavan) आहे.

Follow Us On