Team My pune city – “डॉ. शं. ना. नवलगुंदकर हे (Nigdi)विद्यार्थिप्रिय शिक्षक होते. शिक्षणातून चांगला नागरिक घडवण्याची त्यांची तळमळ असे. प्रभावी वक्तृत्व असल्यामुळे त्यांनी व्याख्यानाच्या माध्यमातून व्यापक प्रबोधन केले. अनेक संस्थांच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. उत्तम संघटक ही त्यांची विशेष ओळख होती. भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचे पुनरावलोकन करत नीतिमान पिढी घडवण्याचे काम त्यांनी केले आहे. आपण एका समाजाभिमुख गुरूला मुकलो आहोत.” अशा शब्दात पुणे विद्यापीठाचे माजी प्र. कुलगुरू डॉ. शं. ना. नवलगुंदकर यांना विविध वक्त्यांनी श्रद्धांजली वाहिली.
निगडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे माजी अध्यक्ष असलेल्या कै. डॉ. शं.ना. नवलगुंदकर यांना स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती, पिंपरी चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती व अन्य संस्थांच्या वतीने श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. भास्कर रिकामे यांनी डॉ. नवलगुंदकर सरांचा परिचय देताना त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी सांगितली.
अत्यंत भावपूर्ण वातावरणात झालेल्या श्रध्दांजली सभेमध्ये सर्वश्री राजेंद्र घावटे – कार्यवाह, पिं. चिं. व्याख्यानमाला समिती, प्रकाश मिठभाकरे- रा. स्व. संघ, पद्मश्री गिरीश प्रभुणे – अध्यक्ष चाफेकर स्मारक समिती, प्रकाशराव मिठभाकरे – रा .स्व.संघ, रविकांत कळमकर- स्वा.सावरकर मंडळ, शामकांत देशमुख- प्रोग्रेसिव एज्यू. सोसायटी, सदाशिव रिकामे – सावरकर मंडळ – श्रीकांत मापारी, राजाभाऊ गोलांडे- अध्यक्ष व्याखानमाला समन्वय समिती, प्रकाश क्षिरसागर- कुटुंबप्रबोधन आदिंनी श्रध्दांजली अर्पण करतांना सरांच्या आठवणी सांगीतल्या, यातुन सरांच्या विविध क्षेत्रातील केलेल्या कार्याचा, नावारूपाला आणलेल्या संस्थांचा व घडवलेल्या व्यक्तिंचा अल्प परिचय झाला. डॉ. शं.ना. यांचे जेष्ठ सुपुत्र हेमंत नवलगुंदकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत कृतज्ञता व्यक्त केली. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे तत्कालीन कार्याध्यक्ष व रा. स्व. संघाचे जिल्हा संघचालक विनोद बन्सल यांनी सभेचा समारोप केला.
कै. डॉ. नवलगुंदकर यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी रा.स्व. संघाचे विभाग कार्यवाह मुकुंदराव कुलकर्णी, सावरकर मंडळाचे संस्थापक कै. कॅ. कदम यांचे सुपुत्र कर्नल रविकिरण कदम, स्नुषा जयश्रीताई कदम, गीताताई खंडकर, पांडुरंग फाटक, ज्योतिताई पठाणीया, विश्वास करंदीकर, अनुजा वनपाळ, प्रकाश टाकळकर, रमेश बनगोंडे, राजेंद्र देशपांडे, विश्वनाथन नायर, विकास देशपांडे,अनंतपुरे काका, राजेंद्र त्र्यंबके, अनिल अढी, एड. सतिश गोरडे, सुहास पोफळे, सुमती कुलकर्णी, राजाभाऊ पोरे, शामराव तावडे, एस. आर. शिंदे, वैदेही पटवर्धन, अश्विनी अनंतपुरे व महिला विभागाच्या अध्यक्षा व सर्व पदाधिकारी, दिपक नलावडे, सातपुते काका, शैलेश भिडे यांच्या सह विविध विभागांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Pimpri Chinchwad Crime News 18 July 2025 : ऑनलाइन माध्यमातून चार लाखांची फसवणूक
Kamshet Crime News : कामशेत येथील टेम्पोच्या अपघातात चालकाचा मृत्यू एक जण गंभीर
श्रद्धांजली सभेला पुण्यातून ही अनेक जण आवर्जून उपस्थित होते.मुख्य ग्रंथपाल सौ. निता जाधव यांचा सरांशी नियमित संपर्क होता. त्यांनी व सुजीतने व्यवस्थित नियोजन केले.
सामुदायिक शांतीमंत्राने सभेची सांगता झाली. प्रदिप पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रम संपल्यानंतर नवलगुंदकर बंधूंनी ग्रंथालय व अभ्यासिकेला भेट दिली. प्रशस्त अभ्यासिका व समृद्ध अशा रवींद्रनाथ ठाकूर ग्रंथालय पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले व ग्रंथालयासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. तथापि मंडळाच्या वतीने सौ. जाधव यांनी त्यांचे आभार मानून सरांनी भरपूर दिलेले आहेच अस सांगून फक्त डॉ. नवलगुंदकर सरांनी सावरकरावर पिएचडीसाठी लिहीलेला प्रबंध उपलब्ध करुन देण्याची विनंती केली. हेमंतजी यांनी पुढील काही दिवसात पोहोच करतो असे सांगून निरोप घेतला.
