Team MyPuneCity –शिक्षण प्रसारक मंडळीच्या इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांनी यंदाच्या इयत्ता पाचवी व आठवीच्या राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची प्रतिमा उंचावली आहे.
इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी आरोही देसाई हिने ७५.१६ टक्के गुण मिळवून विशेष यश संपादन केले आहे. तर इयत्ता आठवीमधील अर्णव ठिपसे याने ७८.३७ टक्के गुण मिळवत उजवा ठसा उमठवला असून सोहम बोलके याने ७१.६२ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
Traffic congestion: तळेगाव-चाकण मार्गावरील वाहतूक कोंडी चिंताजनक; मावळमित्र समितीकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी
Alandi:अपहरण करून वारकरी शिक्षण संस्थेत युवतीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई व संस्था तत्काळ बंदची मागणी
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे शाळा समितीचे अध्यक्ष ॲड. दामोदर भंडारी सर आणि सर्व सदस्यांनी अभिनंदन केले आहे. शाळेच्या प्राचार्या सौ. पल्लवी शानभाग यांनीही विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमाचे व शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे कौतुक करत सर्वांचे अभिनंदन केले.