Team My Pune City –शिक्षण प्रसारक मंडळीच्या मराठी माध्यम, (Nigdi)निगडी शाळेतील आई पालकांसाठी पारंपारिक व मंगळागौर खेळाचे नियोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात महालक्ष्मी अष्टक म्हणून सरस्वती पूजनाने करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सविता बिराजदार ( मराठी माध्यम ), मुख्याध्यापिका सौ.पल्लवी शानभाग( इंग्रजी माध्यम) व उपस्थित पालक यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी दरवर्षी शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात. शालेय वयातच विद्यार्थ्यांना पारंपारिक खेळाचे महत्व पटावे तसेच आपल्या संस्कृतीची जाणीव त्यांना व्हावी व महाराष्ट्राची परंपरा जपावी हे उद्दिष्ट आहे.
श्रावण महिन्याचे औचित्य साधून आजच्या कार्यक्रमासाठी नर्सरी ते इयत्ता-१ ली तील विद्यार्थ्यांचे आई पालक सहभागी झाले होते. पालकांनी छान पारंपरिक वेशभूषा करून मंगळागौरीच्या गाण्यांवर झिम्मा, फुगडी, फेर, अडवळ घूम, सूप सूप, लाट्या बाई लाट्या, खुर्ची का मिरची इत्यादी खेळ खेळण्याचा मनमुराद आनंद घेतला.
Pasaydaan: १४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत ‘पसायदान’ पठणाचे आदेश
Rashi Bhavishya 3 August 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
ह्या विविध पारंपारिक खेळांचे सादरीकरण शाळेतील विद्यार्थ्यांसमोर करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आई पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला महालक्ष्मी अष्टक संगीत शिक्षिका सौ. रमा जोशी यांनी म्हटले. कार्यक्रमाचे नियोजन पूर्व प्राथमिक विभागाच्या सर्व शिक्षकांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षिका सौ. कविता फापाळे यांनी केले.
शाळा समिती अध्यक्ष मा.ॲड दामोदरजी भंडारी यांच्या प्रेरणेतून शाळेच्या मा.मुख्याध्यापिका सौ. सविता बिराजदार यांच्या मार्गदर्शनाने तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या टीमवर्क मुळे हा कार्यक्रम सकाळच्या आनंददायी वातावरणात उत्साहात संपन्न झाला.

