सार्थक फडके याला बाल सावरकर पुरस्कार (Nigdi News)
Team MyPuneCity – स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था, पिंपरी-चिंचवड शहर शाखेच्या वतीने आयोजित राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. चारुदत्तबुवा आफळे यांचे “चापेकर – सावरकर” या विषयावरील विशेष कीर्तन गुरुवारी (५ जून २०२५) निगडी येथील (Nigdi News) ग. दि. माडगूळकर सभागृहात पार पडणार आहे. सायंकाळी ६ ते ८.३० या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी प्रवेश सर्वांसाठी मोफत असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचा नागरी सत्कार (Nigdi News) करण्यात येणार आहे. तसेच, “अनादी मी! अनंत मी!!” या एकांकिकेमध्ये सर्वोत्कृष्ट बाल सावरकरांची भूमिका साकारणाऱ्या सार्थक फडके याला बाल सावरकर पुरस्कार (प्रथम वर्ष) प्रदान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजक अतुल अशोक इनामदार (Nigdi News) असून, ते भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. गजानन लोकसेवा सहकारी बँक व पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे संचालक तसेच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे शहर उपाध्यक्ष आहेत.
स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास विजय कुलकर्णी व स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था परिवार हे कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत.