Team My Pune City -शि. प्र. मंडळीच्या निगडी शाळेमध्ये आषाढीवारी व शाळेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. तसेच या मंगलमय प्रसंगी शाळेमध्ये सत्यनारायण महापूजा करण्यात आली.
शाळा समिती अध्यक्ष ॲड. दामोदरजी भंडारी व रेखा भंडारी यांच्या हस्ते सरस्वती पूजन व पालखी पूजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी संत तुकडोजी महाराज विषयी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
Pavana Dam : पवना धरणात दमदार पावसामुळे जलसाठ्यात मोठी वाढ – साठा 71 % वर
शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांकडून वारीवर आधारित विठ्ठलाचे चित्र आणि अभंग तसेच रस्ता सुरक्षा आणि संघटन मे शक्ती है या विषयावर घोषवाक्य तयार करून याचेही प्रदर्शन भरविण्यात आले तसेच, शिक्षकांसाठी योग कार्यशाळा ,चातुर्मासातील सात्विक पदार्थ हा विषय घेऊन पालकांसाठी पाककला स्पर्धा घेण्यात आली.
Pune:पुण्याच्या पश्चिम भागात सार्वजनिक ट्रान्झिट हब स्थापन करण्याची मागणी;FITE Forum चा मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन



सत्यनारायण पूजेसाठी यमुनानगर परिसरातील माजी नगरसेवक, पिंपरी-चिंचवड परिसरातील पत्रकार, शाळेतील सर्व पालक व विद्यार्थी यांना आमंत्रित करण्यात आले व तीर्थप्रसाद देण्यात आला.
शाळा समिती अध्यक्ष ॲड. दामोदरजी भंडारी यांच्या संकल्पनेतून तसेच मा. मुख्याध्यापिका सविता बिराजदार (मराठी माध्यम ), पल्लवी शानभाग( इंग्रजी माध्यम ) यांच्या मार्गदर्शनाने तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या सहभागातून आजचा कार्यक्रम संपन्न झाला.