Team MyPuneCity – उच्च पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका ५३ वर्षीय व्यक्तीची तब्बल २८ लाख ३१ हजार ७५५ रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला ( Nigdi Crime News) आहे. या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सुनिल सदाशिव सोळांकुरे (वय ५३, व्यवसाय नोकरी, रा. फ्लॅट नं. बी-२, शर्मा कम्पाउंड, बहार कॉम्प्लेक्स, रोज बिल्डिंग, निगडी, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १९ फेब्रुवारी २०२५ ते १५ मे २०२५ या कालावधीत आरोपींनी विविध मोबाईल क्रमांकांवरून संपर्क साधून त्यांना ९० लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज असलेल्या नोकरीचे आमिष ( Nigdi Crime News) दाखवले.
या आमिषाला बळी पडून फिर्यादीने विश्वास ठेवून वेळोवेळी ऑनलाईन व्यवहारातून एकूण २८,३१,७५५ रुपये आरोपींना पाठवले. मात्र त्यानंतर नोकरीबाबत काहीच घडले नाही, तसेच आरोपींनी संपर्कही बंद केला.
या प्रकरणी आरोपी रोहन रॉय चौधरी (मो. क्र. ९५२५४०३१३७, ७०५०३१४५०१) व माधव कुलकर्णी (मो. क्र. ९५२५६०३४२८, ८०५१९६३८८४) यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३१८(४) व माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (डी) अंतर्गत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा तपास निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) मिसाळ करीत ( Nigdi Crime News) आहेत.