situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Nigdi: जैन संतांचा चातुर्मास प्रवेश, ‘धर्मवृष्टी’ उपक्रमाने शहरात आध्यात्मिक उत्साह

Published On:

Team My Pune City -पिंपरी-चिंचवड शहरात जैन समाजाच्या १५ संघांच्या संयुक्त आयोजनातून ‘धर्मवृष्टी चातुर्मास’ उपक्रमाची सुरुवात झाली आहे. ६ जुलै रोजी खानदेश मराठा मंडळ, निगडी येथे आचार्य श्रीमद विजय अक्षयबोधिसुरी महाराज आणि आचार्य श्रीमद विजय महाबोधिसुरी महाराज यांचा चातुर्मास प्रवेश झाला. या निमित्ताने शहरात अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे.

युवांसाठी प्रेरणादायी कार्य

सन १९७७ पासून आचार्य श्रींनी युवांमध्ये सकारात्मक परिवर्तन घडावे आणि त्यांना योग्य दिशा मिळावी यासाठी विहार सेवा ग्रुप*ची स्थापना केली. आज देशभरात सुमारे २५,००० युवक या ग्रुपशी जोडले गेले आहेत. हे युवा संतांसोबत विहारात सहभागी होऊन विविध सेवा उपक्रमांत कार्यरत असतात. दरवर्षी आयोजित होणाऱ्या विहार संमेलनात सुमारे ४,००० प्रमुख युवक सहभागी होत असून, समाजपरिवर्तनासाठी प्रेरणादायी शिकवण दिली जाते.

चातुर्मास कार्यक्रमांची सुसंगत रूपरेषा

Chandrakant Patil:दिवंगत माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी समृद्ध जीवन जगले – शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची श्रद्धांजली

पीसीएमसी जैन महासंघाच्या वतीने पुढील ४० दिवस विविध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे :

  • सोमवार ते शुक्रवार (सकाळी ८.३० ते ९.३०) – प्रवचन सत्र
  • प्रत्येक शनिवार (सकाळी ८.३० ते १०) – विशेष विषयांवरील प्रवचन
  • प्रत्येक रविवार (दुपारी २.३० ते ४.३०) – लहान मुलांसाठी संस्कार शिबिर
  • प्रत्येक रविवार (सकाळी ९ ते १२) – गीत, संगीत, भक्ती अनुष्ठान
  • प्रत्येक शनिवार (दुपारी २ ते ४) – महिलांसाठी विशेष शिबिर

या चातुर्मास काळात समाजातील नकारात्मकतेला दूर करण्यासाठी विश्वस्थानक तप मंत्र आणि नमस्कार महामंत्र यांचा सामूहिक २.५ कोटी वेळा जप करण्यात येणार आहे. या मंत्रजपात सुमारे ५०० श्रद्धावान सहभागी होणार आहेत.

सामूहिक मंत्रजपाचा विशेष सोहळा

दि. १३ जुलै २०२५ रोजी ‘श्री नमस्कार महामंत्र राज्य’ या विशेष उपक्रमांतर्गत २.५ कोटी वेळा सामूहिक मंत्रजप करण्यात येणार आहे.

जैन महासंघातर्फे सर्व भाविकांना या ‘धर्मवृष्टी चातुर्मास’ उपक्रमात सहभागी होण्याचे आणि अध्यात्मिक लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Us On