Team My pune city – निगडी लोकमान्य टिळक चौक ते आकुर्डी श्री खंडोबा मंदिर चौक पर्यंतच्या सेवा रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुमित जाधव सोशल फाउंडेशन च्या अध्यक्ष दीपा काटे यांच्या नेतृत्वात बजाज ऑटो गेट जवळ घंटा नाद आंदोलन करण्यात आले आहे.
Uddhav Thackeray :एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच- उद्धव ठाकरे
प्रसंगी या घंटा नाद आंदोलनात स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. सदर आंदोलन पिंपरी चिंचवड शहरात लक्षवेधी ठरलं असून. या बाबत आज स्थापत्य विभागाच्या कार्यकारी अभियंता ननावरे यांना निवेदन देण्यात आले आहे.
Pavana Dam : पवना धरणात दमदार पावसामुळे जलसाठ्यात मोठी वाढ – साठा 71 % वर