situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Nigdi: निगडी प्राधिकरण येथे सशस्त्र दरोडा

Published On:

Team My Pune City –प्राधिकरण निगडी येथे शनिवारी (१९ जुलै) रात्री (Nigdi)एका बंगल्यात दरोडा पडला. तोंड बांधून आलेल्या आरोपींनी व्यावसायिकाच्या बंगल्यात केअर टेकर म्हणून काम करणाऱ्या कुटुंबातील सर्वांचे हात, पाय आणि तोंड चिकटपट्टीने बांधून त्यांना खोलीत कोंडले. त्यानंतर व्यावसायिकाला हाताला बांधून पिस्तुलाच्या धाकाने दरोडा टाकण्यात आला. दरोडा टाकून दरोडेखोर पळून गेले. यामध्ये सहा लाख १५ हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. ही घटना शनिवारी रात्री नऊ ते साडेदहा वाजताच्या सुमारास सेक्टर क्रमांक २७, प्राधिकरण निगडी येथे घडली.

याप्रकरणी व्यावसायिक चंद्रभान छोटेराम अगरवाल (७६, प्राधिकरण निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेसह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon Dabhade: स्वावलंबी शिक्षण ही आताच्या काळाची गरज- बाळा भेगडे

Pune: “कबड्डी महर्षी स्व. शंकरराव ऊर्फ बुवा साळवी चषक २०२५ ” व पुणे लिग कबड्डी स्पर्धा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अगरवाल हे शनिवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घरात टीव्ही पाहत बसले होते. त्यावेळी चार ते पाच दरोडेखोर मुख्य दरवाजातून घरात आले. त्यांनी अगरवाल यांना पिस्तूल दाखवले आणि तिजोरी कुठे आहे, असे विचारले. त्यानंतर अगरवाल यांचे हात, पाय बांधून तोंडावर चिकटपट्टी चिकटवली. त्यापूर्वी आरोपींनी केअर टेकर महिलेसह तिच्या पती आणि दोन्ही मुलांना बांधून, तोंडाला चिकटटेप लावून खोलीत बंद केले.

दरोडेखोरांनी घरातील सर्व खोल्यांमधील साहित्य अस्ताव्यस्त केले. यामध्ये दोन लाख ४० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन बांगड्या, ८० हजार रुपये किमतीची सोन्याची रिंग व नथ, ८० हजार रुपये किमतीची चांदीची एक किलो वजनाची वीट, ८० हजार रुपये किमतीची एक किलो वजनाची चांदीची भांडी, एक लाख २० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी, १० हजार रुपये किमतीचे घड्याळ, पाच हजार रुपये रोख रक्कम, दोन आधार कार्ड, कारचे आरसी बुक असा एकूण सहा लाख १५ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. निगडी पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Follow Us On