Team My Pune City — निगडी ते आकुर्डी खंडोबा माळ दरम्यान मुंबई-पुणे महामार्गावर सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पामुळे रस्त्यावर मोठे खड्डे निर्माण ( Nigdi-Akurdi Road) झाले असून, या खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्याने हे खड्डे दिसत नाहीत, परिणामी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
Lohagad: लोहगड आणि विसापूर किल्ल्यांना तारेच्या कंपाउंडचा वेढा, शिवप्रेमींमध्ये नाराजी
या पार्श्वभूमीवर भाजपचे शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यावर दुर्लक्षाचा आरोप करत तातडीने खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे. अन्यथा निगडी टिळक चौक येथे रस्त्यावर झोपून आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी ( Nigdi-Akurdi Road) दिला आहे.
Lohagad: लोहगड आणि विसापूर किल्ल्यांना तारेच्या कंपाउंडचा वेढा, शिवप्रेमींमध्ये नाराजी
विशेषतः मधुकर पवळे उड्डाणपूल बीआरटी बस स्टॉप ते आकुर्डी खंडोबा माळ या भागात खड्ड्यांची स्थिती अत्यंत गंभीर आहे. मेट्रो प्रकल्पासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी पत्र्यांच्या कंपाउंडभोवती देखील अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. या संपूर्ण रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना जीव मुठीत धरावा लागत आहे.
या पार्श्वभुमीवर त्यांनी प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत:
निगडी ते आकुर्डी खंडोबा माळ रस्त्यावरचे सर्व खड्डे तात्काळ बुजवावेत.
या कामासाठी दोन दिवस रस्ता बंद करून योग्य दुरुस्ती करण्यात यावी.
आयुक्तांनी स्वतः या मार्गाची पाहणी करून उपाययोजना कराव्यात अशी मागणी पत्रकाद्वारे ( Nigdi-Akurdi Road) करण्यात आली आहे.