Team MyPuneCity –राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) पुणे आयएसआयएस मॉड्यूल प्रकरणात मोठी कारवाई करत दोन फरार दहशतवाद्यांना अटक केली आहे. अब्दुल्ला फैयाज शेख आणि तलहा लियाकत खान अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही इंडोनेशियात लपून बसले होते. या दहशतवाद्यांना सध्या मुंबईत आणण्यात आले असून, लवकरच न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Pune: नाईलाजास्तव वृद्धाश्रम काढावे लागतात – अजित पवार
एनआयएच्या माहितीनुसार, हे दोघेही पुणे आयएसआयएस मॉड्यूल प्रकरणाशी (NIA) संबंधित आहेत. त्यांनी या मॉड्यूलअंतर्गत IED तयार करण्याच्या कार्यशाळा, जंगलात फायरींग प्रॅक्टिस, लपण्यासाठी ठिकाणं शोधणे, तसेच सशस्त्र दरोडे आणि चोरीद्वारे निधी उभारणे अशा गंभीर कारवायांमध्ये सहभाग घेतला होता.
अब्दुल्ला फैयाज शेख हा पुण्याच्या कोंढवा परिसरातील मितानगरचा रहिवासी असून, तलहा लियाकत खान वानवडी परिसरात राहत होता. हे दोघेही गेल्या काही काळापासून फरार होते. त्यांच्या अटकेसाठी एनआयएने प्रत्येकी ३ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. अटक केल्यानंतर दोघांना थेट मुंबईत आणण्यात आले आहे. दहशतवाद्यांना लवकरच न्यायालयात हजर करण्यात (NIA) येणार आहे.