केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची श्रीरंग बारणे यांनी दिल्लीत घेतली भेट
Team My pune city – मुंबई–पुणे राष्ट्रीय मार्गावरील प्रचंड वाहतूक, खड्ड्यांची दयनीय स्थिती आणि अरुंद रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून याचा ( NH-48) नागरिकांवर प्रतिकूल परिणाम होत असल्याने या महामार्गाचा तातडीने विस्तार व दुरुस्ती करण्याची मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.
Development plan : विकास आराखड्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा
मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेऊन ही समस्या मांडली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ हा मुंबईपासून सुरू होऊन पुणे, सातारा, कोल्हापूर, बेंगळुरूमार्गे चेन्नईपर्यंत जातो. ( NH-48) या मार्गावरील प्रचंड वाहतूक, खड्ड्यांची दयनीय स्थिती आणि अरुंद रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, व्यापार व दळणवळणावरही प्रतिकूल परिणाम होत आहे.
TP Scheme in Darumbre : दारुंब्रे गावातील टी.पी. योजनेला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
खासदार बारणे यांनी यावेळी सांगितले की, पुणे हे राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असून ते अनेक महत्त्वाच्या शहरांशी जोडले गेले आहे. मात्र, NH-48 च्या सध्याच्या अवस्थेमुळे पुणे आणि परिसरातील नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः कार्ले फाटा, वडगाव फाटा, तळेगाव फाटा आणि देहूरोड फाटा या ठिकाणी उड्डाणपूलांची गरज असून, त्यांची उभारणी ( NH-48) तातडीने झाली पाहिजे. तसेच, महामार्गाची लेन वाढवणे, रस्ते दुरुस्ती करणे आणि आधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली लागू करणेही आवश्यक आहे.या मार्गाच्या सुधारित कामांमुळे प्रवास अधिक सुरक्षित, जलद व सुलभ होईल, व्यापाराला गती मिळेल आणि अपघातांचे प्रमाणही कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खासदार बारणे यांनी या भागाच्या औद्योगिक, सामाजिक आणि नागरी विकासासाठी NH-48 च्या विस्तार, दुरुस्ती व पायाभूत सुधारणा तातडीने व्हाव्यात, अशी मागणी यावेळी ( NH-48) केली.