Team My Pune City – १ नोव्हेंबर २०२५ पासून देशातील ( New Rules) नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करणारे काही महत्त्वाचे नियम लागू होणार आहेत. या बदलांचा परिणाम तुमच्या खिशावर आणि आर्थिक व्यवहारांवर होणार असून, आधार कार्ड, बँक खाते, क्रेडिट कार्ड, म्युच्युअल फंड आणि गॅस सिलेंडर यासंबंधी नवे नियम लागू होतील.
आधार कार्ड अपडेट आता सोपे ( New Rules)
आधार कार्डातील नाव, पत्ता, जन्मतारीख किंवा मोबाईल नंबर बदलण्यासाठी आता केंद्रावर जाण्याची गरज नाही. UIDAI ने प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल केली असून, PAN, पासपोर्ट, रेशन कार्ड यांसारख्या सरकारी डेटाबेसमधून माहिती आपोआप तपासली जाईल. फक्त बायोमेट्रिक अपडेटसाठी केंद्रावर जावे लागेल.
SBI क्रेडिट कार्ड शुल्क वाढणार ( New Rules)
SBI क्रेडिट कार्डधारकांना आता काही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. अनसिक्योर्ड कार्डवर ३.७५ टक्के चार्ज लागू होईल. तसेच CRED, CheQ, Mobikwik सारख्या थर्ड पार्टी ॲप्समधून शाळा-कॉलेज फी भरल्यास १ टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. मात्र थेट शाळेच्या वेबसाइटवरून पेमेंट केल्यास कोणताही चार्ज लागणार नाही.
Crime News: मुलाच्या लग्नाआधीच आईचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू, मोहननगरमधील हृदयद्रावक घटना
बँक नॉमिनेशनमध्ये मोठा बदल ( New Rules)
आता बँक खाते, लॉकर किंवा सेफ कस्टडीसाठी एकाऐवजी चार नॉमिनी नेमण्याची परवानगी मिळणार आहे. यामुळे खातेदाराला आपल्या संपत्तीचा हिस्सा वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये वाटून देणे सोपे होईल.
म्युच्युअल फंड व्यवहारांवर कडक नियम ( New Rules)
SEBI ने पारदर्शकता वाढवण्यासाठी नवे नियम लागू केले आहेत. AMC चे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांचे नातेवाईक १५ लाखांपेक्षा जास्त व्यवहार करत असल्यास त्याची माहिती कंपनीच्या कंप्लायन्स ऑफिसरला देणे बंधनकारक असेल.
Run for Unity : ‘रन फॉर युनिटी’मधून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
गॅसच्या किमतीत बदल
नेहमीप्रमाणे महिन्याच्या पहिल्या दिवशी LPG, CNG आणि PNG च्या किमतीत बदल होणार आहे. १ नोव्हेंबरपासून दर वाढतील की कमी होतील, हे उद्या स्पष्ट ( New Rules) होईल.


















