Team My Pune City – पुणे शहरातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने( NDA student suicide) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृत विद्यार्थ्याचे नाव अंतरिक्ष कुमार (वय १८, मूळ लखनौ, उत्तर प्रदेश) असे असून, तो माजी सैनिकाचा मुलगा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अंतरिक्षने जुलै महिन्यात एनडीएमध्ये पहिल्या सत्रासाठी प्रवेश घेतला ( NDA student suicide) होता.
आज पहाटेच्या सुमारास त्याने वसतिगृहातील खोलीत गळफास घेतल्याचे समोर आले. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू ( NDA student suicide) आहे.