Team My pune city – एका कार चालकाने त्याच्या ताब्यातील कार रस्त्याच्या बाजूला रस्त्याच्या बाजूला बसलेल्या श्वानाच्या अंगावर घातली. श्वानावरून कार गेल्याने ते मोठमोठ्याने ओरडू लागले. त्यावेळी कार चालकाने पुन्हा कार अंगावर चालवून त्यास आणखी जखमी केले. ही घटना नवी सांगवी येथे सोमवारी (३० जून) सकाळी सव्वानऊ वाजताच्या ( Navi sangvi) सुमारास घडली.
Bribe : वरिष्ठ लिपिक महिलेला लाच घेताना रंगेहाथ पकडले
कुणाल भारत कामत (४०, नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नितीन ढावळे (चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास आरोपीने त्याची कार (एमएच १२/केटी ०४४९) फुटपाथजवळ बसलेल्या एका कुत्र्यावर मुद्दाम डाव्या बाजूची दोन चाके घातली. यामध्ये कुत्रा जखमी झाला. कुत्रा जोरजोरात ओरडू लागला. असे असताना कार चालकाने पुन्हा कार रिव्हर्स घेत डाव्या बाजूच्या मागच्या चाकाने कुत्र्याला चिरडले. यामुळे कुत्रा गंभीर जखमी झाला आहे. प्राणी मित्रांनी कुत्र्याला रुग्णालयात दाखल केले आहे. प्राणीमित्र कुणाल कामत यांनी चालकाबाबत माहिती मिळवून त्यास जाब विचारला असता चालकाने कामत यांना ( Navi sangvi) धमकी दिली.