Breaking
23 Mar 2025, Sun

Pratibha College : प्रतिभा कॉलेजला सायबर सुरक्षा अभियानात राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट पुरस्कार

Pratibha College

Team MyPuneCity – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटीच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत प्रतिभा कॉलेज (Pratibha College) ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीजने सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या जनजागृती उपक्रमासाठी राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट पुरस्कार पटकावला आहे. हा पुरस्कार महाविद्यालयाला पुण्यात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

डॉ. दीपक शहा यांच्या नेतृत्वाखाली आणि क्विक हिल फाउंडेशनच्या सहकार्याने गेल्या दोन वर्षांपासून सायबर सुरक्षा जनजागृतीसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पिंपरी चिंचवड, तळवडे, रुपीनगर, लोणावळा यांसारख्या भागांत शाळा, महाविद्यालये, भाजी मंडई, बस स्थानके आणि नागरी वस्त्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.

महाविद्यालयाला मिळालेल्या पुरस्कारांचे तपशील

या अभियानातील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत प्रतिभा महाविद्यालयाने (Pratibha College) क्विक हिल फाउंडेशनच्या वतीने दिल्या जाणाऱ्या आठ श्रेणींपैकी पाच श्रेणींमध्ये पुरस्कार मिळविले आहेत. त्यामध्ये खालील पुरस्कारांचा समावेश आहे:

  • राष्ट्रीय सायबर सुरक्षा शिक्षण पुरस्कार: महाविद्यालयाला
  • शिक्षक श्रेणीतील पुरस्कार: डॉ. हर्षिता वाच्छा, प्रा. सुप्रिया गायकवाड, प्रा. उज्वला फलक
  • विद्यार्थी श्रेणीतील पुरस्कार: राष्ट्रपती विजेता दिपू सिंग
  • सर्वोत्कृष्ट पी.आर. मीडिया डायरेक्टर पुरस्कार: बतुल परवाला
  • सर्वोत्कृष्ट सायबर वॉरियर्स पुरस्कार: श्रावणी सावंत, ओम जगताप

Book Release : सुविद्या करमरकर लिखित ‘माझे आकाश’  पुस्तकाचे प्रकाशन

कार्यक्रमात मान्यवरांची उपस्थिती

या पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्यासोबत सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, सायबर विभागाचे उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे, क्विक हिल फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास काटकर यांची उपस्थिती होती.

Shrirang Kala Niketan : तळेगावात रंगणार युवा कलाकारांची शास्त्रीय संगीताची मैफल ‘राग रंग’

महाविद्यालयात उत्सवाचे वातावरण

प्रतिभा महाविद्यालयाच्या या यशानंतर महाविद्यालयात उत्सव साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. ए.के. वाळुंज, उपप्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया यांच्यासह प्राध्यापक व कर्मचारी वर्गाने या दैदीप्यमान यशाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

या उपक्रमामुळे सायबर सुरक्षेचे महत्त्व समाजात प्रभावीपणे पोहोचवण्याचे कार्य प्रतिभा महाविद्यालयाने केले असून, हा पुरस्कार महाविद्यालयाच्या यशाचा मोलाचा ठसा आहे.

 

By Vivek