Team My Pune City – नाना पेठ परिसरातील टोळीयुद्ध ( Nana peth Murder Case) आणि कौटुंबिक वादातून अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या आयुष उर्फ गोविंद कोमकरच्या खून प्रकरणी पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे. आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू अण्णा राणोजी आंदेकर (वय 64) याच्यासह 13 साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.
Rashi Bhavishya 11 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्यांचे प्रतिस्पर्धी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष याचा ५ सप्टेंबर रोजी निर्घृण खून करण्यात आला होता. ( Nana peth Murder Case) आयुष हा स्वतः बंडू आंदेकर याचा नातू होता. या दुहेरी वादातून नाना पेठ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर तातडीने गुन्हा दाखल करून पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली असून, काही आरोपी अद्याप पसार आहेत.
बंडू अण्णा आंदेकरसह तुषार वाडेकर (२४), स्वराज वाडेकर (२१), वृंदावनी वाडेकर (४०), अमन युसूफ पठाण उर्फ खान (२२), सुजल मेरगू (२३) यांना पोलिसांनी बुलढाणा परिसरातून अटक केली. यापूर्वीच अमित पाटोळे (१९) आणि यश पाटील (१९) यांना ताब्यात घेण्यात आले होते.
कृष्णराज उर्फ कृष्णा आंदेकर (४०), शिवम आंदेकर (३१), लक्ष्मी आंदेकर (६०), अभिषेक आंदेकर (२१) आणि शिवराज आंदेकर (२०, सर्व रा. नाना पेठ) हे आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके कार्यरत आहेत.
3D model photo : ‘3D मॉडेल फोटो’ ट्रेंड चा सोशल मीडियावर धूमाकूळ
या टोळीविरुद्ध मकोका कारवाईचा प्रस्ताव समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी तयार केला. हा प्रस्ताव अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे आणि परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त ऋषीकेश रावले यांच्याकडे पडताळणीसाठी पाठवण्यात आला. सखोल तपासानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आंदेकर टोळीविरुद्ध ‘मकोका’ लागू करण्याचे ( Nana peth Murder Case) आदेश दिले.