Team My Pune City – चिंचवडच्या माणिक कॉलनीत घडलेल्या ( Nakul Bhoir Murder) एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर स्तब्ध झाला आहे. समाजिक कार्यकर्ते नकुल आनंदा भोईर (वय ४०) यांचा त्यांची पत्नी चैताली भोईर हिनेच गळा दाबून खून केला. विशेष म्हणजे, ही घटना भाऊबीजेच्या रात्रीच घडली.
नकुल आणि चैताली यांचा विवाह प्रेमविवाह होता. दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. देवाब्रह्मणाच्या साक्षीने सात जन्मांसाठी साथ देण्याची वचने देत त्यांनी संसाराचा आरंभ केला. त्यांच्या संसारवेलीवर दोन गोंडस मुलं फुलली. दोघांनाही सामाजिक कार्याची आवड होती. नकुलने पत्नीला प्रोत्साहन देत आगामी पालिका निवडणुकीत तिच्या उमेदवारीसाठी काही दिवसांपूर्वी मोठा आणि भव्य कार्यक्रमही आयोजित केला होता.
Bibwewadi Crime News : बिबवेवाडीतील तरुणाकडून दोन देशी बनावटीच्या पिस्तुलांसह जिवंत काडतूस जप्त
मात्र, मागील काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. चैतालीच्या वागणुकीवरून नकुलला संशय येत होता. या संशयावरून त्यांच्यात वारंवार वाद होत होते. नकुल मात्र ‘संसार म्हटला की भांड्याला भांडे लागतेच’ या उक्तीप्रमाणे हे वाद मनावर घेत ( Nakul Bhoir Murder) नव्हता.
भाऊबीजेच्या सणाच्या मुहूर्तावर दोघांनी एकत्र सण साजरा केला, रात्री जेवणही केले. मुले शेजारच्या खोलीत झोपली होती. पण रात्री अंदाजे दोन ते अडीचच्या दरम्यान चैतालीने झोपेत असलेल्या नकुलचा गळा कपड्याने आवळला. नकुल गाढ झोपेत असल्याने तो काहीच प्रतिकार करू शकला नाही.
विशेष म्हणजे, नकुल निष्प्राण पडल्यावर चैतालीने स्वतःच पोलिसांना फोन करून सांगितले, “मी माझ्या नवऱ्याचा गळा दाबून खून केला आहे.” पोलिस तत्काळ ( Nakul Bhoir Murder) घटनास्थळी दाखल झाले व तिला ताब्यात घेतले.
या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सर्वांच्या मनात एकच प्रश्न — “इतके प्रेम करणाऱ्या या दांपत्यामध्ये एवढी कटुता कशी निर्माण झाली?” दोन लहान मुलांना आता पित्याशिवाय जगावे लागणार आहे.
Water Supply : सोमाटणे पंपिंग स्टेशनवरील मुख्य दाबनलिका तुटल्याने पाणी पुरवठा खंडित, तळेगावकरांना आज करावा लागणार पाणी बंदचा सामना
चैतालीने हा टोकाचा निर्णय नेमका का घेतला, तिच्या मनात एवढा राग कशामुळे निर्माण झाला आणि नकुलच्या मनात संशयाचं भूत कशामुळे घुसलं, यात आणखी कोणी तिसरी व्यक्ती कारणीभूत आहे का, या सर्व पैलूंचा चिंचवड पोलिस तपास करीत ( Nakul Bhoir Murder) आहेत.
समाजात लोकप्रिय असलेल्या नकुल भोईर यांच्या अकाली मृत्यूने सर्वत्र शोककळा पसरली आहे. या घटनेने पुन्हा एकदा प्रश्न उभा राहतो — नात्यात मतभेद झाले म्हणजे त्याचा शेवट जीव देणे किंवा घेणे यातच का व्हावा, या प्रश्नाचे उत्तर मात्र अजूनही अनुत्तरीत ( Nakul Bhoir Murder) आहे.


















