Team My pune city – श्रावण शुद्ध पंचमी अर्थात नागपंचमीचा सण ( Nagpanchami)हा आळंदी, परिसरातील गावांमध्ये सर्वत्र पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नागपंचमीच्या सणाला घरोघरी देव्हाऱ्याजवळ नाग-नरसोबाचे चित्र चिटकवून तसेच देवाजवळ रांगोळी काढून नामपंचमीची विधीवत पूजा करण्यात येते. घरोघरी नाग-नरसोबा या देवतेला लाह्या, दूध, पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात येतो.
Crime News : कॉलेजच्या फ्रेशर पार्टीवरून वाद, विद्यार्थ्यावर कोयत्याने वार
प्रथा परंपरेनुसार आळंदी मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्यावतीने नाग देवतेची ( Nagpanchami) सनई चौघड्यात मिरवणूक निघते. जुन्या नगरपरिषदेच्या जवळील जागेत नाग देवतेची पूजा होते. ही पूजा सर्वप्रथम आळंदीतील स्थानिक सेवेकरी (कुऱ्हाडे पाटील,घुंडरे पाटील,चिताळकर पाटील इ.) मानकरी कुटुंबातील महिला करतात.
Rashi Bhavishya 29 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
आळंदीत प्रथा परंपरे नुसार नगरपालिका चौकात नागदेवतेच्या( Nagpanchami) मूर्ती चे पूजन होऊन लक्ष्मी नारायण ,राम मंदिर या परिसरा मार्गे नागदेवतेच्या मूर्तीस मंदिरात आणले जाते.यावेळी पुष्पा चिताळकर पाटील, रेखा कुऱ्हाडे पाटील, ज्योती चिताळकर पाटील, राजश्री कुऱ्हाडे पाटील, सृष्टी घुंडरे पाटील, लक्ष्मी कुऱ्हाडे पाटील, परिणिती कुऱ्हाडे सहभागी होत्या.राहुल चिताळकर पाटील, योगीराज कुऱ्हाडे पाटील, विठ्ठल घुंडरे पाटील, भीमाशंकर वाघमारे, बारकू वाघमारे, पुरुषोत्तम वाघमारे आदी उपस्थित होते.
मंदिरात सकाळ पासून या नागदेवतेच्या पूजनासाठी महिलांनी गर्दी केली होती.यावेळी महिलांनी मनोभावे नागदेवतेची पूजन करून दूध,लाह्या,दुर्वा आघाडा व पुरण पोळीचा नैवद्य त्यास अर्पण करण्यात आले.काही परिसरातील गावात वारुळांची पूजा होते.नागपंचमी निमित्त झाडाच्या फांदीला ( Nagpanchami) दोरी बांधत झोका खेळला जातो.