Team My Pune City – राज्य निवडणूक आयोगाने पुणेसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदारयादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ही प्रक्रिया 28 नोव्हेंबरपर्यंत अंतिम करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. ही घटना शुक्रवार (18 ऑक्टोबर) रोजी जाहीर करण्यात आली.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, पुणे महापालिका आणि इतर महापालिका आयुक्तांनी प्रारूप मतदारयादी स्थानिक वृत्तपत्र, महापालिका कार्यालये व संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. या यादीत नव्याने नावे समाविष्ट होणार नाहीत; मात्र दुबार नावे, मृत व स्थलांतरित मतदारांची नोंद वगळणे आणि तांत्रिक चुका दुरुस्त करण्यासाठी हरकती व सूचना स्वीकारल्या जातील. नागरिकांना ६ नोव्हेंबरपर्यंत या यादीबाबत हरकती नोंदवता येणार आहेत.
Kondhwa: कोंढवा पोलिस कारवाईदरम्यान ड्रग ट्रॅफिकरचा मृत्यू
Talegaon Dabhade: संध्यासूरांत न्हाली ‘इंद्रायणी’ ची दिवाळी
मतदारयादीत हरकत व सूचना मिळाल्यानंतर महापालिका प्रशासनाने त्यावर आवश्यक सुधारणा करून अंतिम मतदारयादी २८ नोव्हेंबरला प्रसिद्ध करावी लागणार आहे. मतदान केंद्रांची यादी ४ डिसेंबरला आणि अंतिम मतदारयादी केंद्रनिहाय १० डिसेंबरला जाहीर केली जाणार आहे. पुणे महापालिका निवडणुकीची औपचारिक तयारी या यादीच्या प्रकाशनानंतर सुरू होणार असून डिसेंबर अखेरपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.