situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग दहा पदरी; वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास होणार अधिक जलद

Published On:

Team My Pune City – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचा विस्तार आता ( Mumbai-Pune Expressway) थेट दहा पदरी करण्यात येणार आहे. सध्या सहा पदरी असलेल्या या मार्गाचे आठ पदरीकरण करण्याचा प्रारंभीचा विचार होता. मात्र वाढती वाहनसंख्या आणि महामार्गाचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) दहा पदरीकरणाचा निर्णय घेतला आहे. यासाठीचा सविस्तर प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून पुढील दहा दिवसांत तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.

Crime News : एसटी बसमधील गर्दीचा फायदा घेत प्रवाशांची पर्स चोरी करणाऱ्या तिघी महिला चोरट्या जेरबंद


दहा पदरीकरणानंतर मुंबई-पुणे प्रवास अधिक वेगवान होईल आणि वाहतूक कोंडी ( Mumbai-Pune Expressway) मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दररोज ६५ हजारांहून अधिक वाहने या मार्गावरून प्रवास करतात. त्यामुळे विद्यमान सहा पदरी रस्ता अपुरा पडत असून कोंडी आणि सुरक्षिततेचे प्रश्न गंभीर होत आहेत.

Maval Crime News : मावळातील सुदवडी येथे हातभट्टी दारू निर्मितीचा पर्दाफाश


या विस्तारासाठी सुमारे सहा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सुरुवातीला आठ पदरीकरणाचा प्रस्ताव जून महिन्यात राज्य सरकारकडे पाठवायचा होता, मात्र काही कारणांमुळे त्यात विलंब झाला. आता मात्र पुढील काही दिवसांत हा प्रस्ताव सादर केला जाणार ( Mumbai-Pune Expressway) आहे.


सध्या सल्लागारांच्या माध्यमातून प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे. एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील दहा-बारा दिवसांत हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला जाईल. मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवली जाईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. कंत्राटदाराला हे काम चार वर्षांत पूर्ण करणे बंधनकारक असेल. त्यामुळे २०३० पर्यंत दहा पदरीकरणाचे काम पूर्ण होण्याची शक्यता ( Mumbai-Pune Expressway) आहे.

Follow Us On