Team My Pune City – रूम खाली करण्यावरून झालेल्या वादातून एका भावजयीने नणंदेला (Mulshi)शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने डोक्यात मारून जखमी केले आणि जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी (१२ ऑक्टोबर) रोजी सायंकाळी घोटावडे फाटा, मुळशी येथे घडली.
या प्रकरणी नणंदेने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिर्यादी महिलेच्या भावाच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Thackeray Brothers: ठाकरे बंधू एकत्र! मविआ-मनसे नेत्यांचं शिष्टमंडळ निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला
Maval: पत्नीची पतीला मारहाण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांची भावजय आरोपी हिला तिची रूम खाली करण्यास सांगण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी भावजयीने फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. इतकेच नाही तर तिने घराशेजारी पडलेले लाकडी दांडके घेऊन फिर्यादीच्या डोक्यात मारले आणि तिला जखमी केले. मारहाण केल्यानंतर तिने फिर्यादीला ‘लोणावळ्यावरून मी पोरं आणते आणि तुझ्याकडे बघूनच घेते, तुझ्या कुटुंबाला आता सोडतच नाही’ अशी धमकी दिली. बावधन पोलीस तपास करत आहेत.