Team My Pune City – एका पेंटरने काम करण्यासाठी नकार दिल्याच्या कारणावरून(Mulshi) त्याला मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (19 ऑक्टोबर) सायंकाळी मुळशी तालुक्यातील नेरे येथे घडली.
शिवाजी शेखर भालेराव (42, कासारसाई, मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वसंत राठोड (40, नेरे दत्तवाडी, मुळशी), विशाल जाधव (50, नेरे दत्तवाडी मुळशी) आणि त्यांच्या साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sandeep Khardekar: विविध मंडळाना उपयुक्त वस्तू भेट देताना दीपावली चा आनंद द्विगुणित – संदीप खर्डेकर
Annual Horoscope 2026 : वार्षिक राशीभविष्य 2026 – मीन रास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वसंत राठोड आणि विशाल जाधव यांनी फिर्यादी शिवाजी यांना पेंटिंगचे काम सांगितले होते. ते काम करण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे आरोपींनी शिवाजी यांना नेरे गावातील आयएमएस कॉलेज येथे बोलावून घेतले. तिथे त्यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यात आली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.


















