Team My Pune City –मुळशी परिसरातील काही आरोपींनी पी.ए.सी.एल (Mulshi)कंपनीतील गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यासाठी बनावट खरेदीदस्तऐवज तयार करून जमीन विक्री/हस्तांतरण केले. ही फसवणूक २०१५ ते २०१९ दरम्यान घडली.
या प्रकरणात पांडुरंग विश्वंभर पवार (४५, खेड, पुणे) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चंद्रकांत सांगलीकर (फ्लॅट ४, ब्रम्हा क्लासीक, पुणे), आकाश चौहान (लक्ष्मीनगर, दिल्ली), नितीन थोपटे (वडगाव बुद्रुक), गोवर्धन बांदल (सुसगाव, पुणे), प्रमोद चांदेरे (सुस, पुणे), रविंद्र चिंचवडे (चिंचवड), इंद्रजीत व राजेंद्र वाघमारे (नाना पेठ, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
Kondhwa: कोंढवा पोलिस कारवाईदरम्यान ड्रग ट्रॅफिकरचा मृत्यू
Talegaon Dabhade: संध्यासूरांत न्हाली ‘इंद्रायणी’ ची दिवाळी
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी पी.ए.सी.एल कंपनीतील गुंतवणूकदारांना फसवण्यासाठी १३.१६ हेक्टर जमीन बनावट दस्तऐवजाद्वारे विकली. यामुळे गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक हानी झाली. बावधन पोलीस ठाणे या प्रकरणाचा तपास करीत आहे.