Team My Pune City –नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC)(एमएसआरटीसी) अर्थात लालपरीने भाविकांसाठी एक खास उपक्रम जाहीर केला आहे. पुणे विभागातून २७ सप्टेंबर २०२५ पासून ‘शक्तीपीठ दर्शन’ या विशेष बस सेवेची सुरुवात होणार आहे. या सेवेमुळे भक्तांना राज्यातील साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन एका प्रवासात घेण्याची संधी मिळणार आहे.
या सेवेतून भाविकांना कोल्हापूरची अंबाबाई (महालक्ष्मी देवी), तुळजापूरची तुळजा भवानी, माहूरची रेणुका माता आणि नाशिक येथील सप्तशृंगी देवी या देवस्थानांचे दर्शन घडवले जाणार आहे. पुण्यातील शिवाजीनगर आणि स्वारगेट येथून सकाळी ७ वाजता या बसेस सुटतील.
तिकीट दरांमध्येही विशेष सुविधा देण्यात आली आहे. पुरुषांसाठी तिकीट दर ३,१०१ रुपये, तर महिलांसाठी १,५४९ रुपये ठेवण्यात आले आहेत. महिलांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे नवरात्रातील दर्शनयात्रा आता अधिक परवडणारी ठरणार आहे.
Pune : व्यवसायवाढीसाठी ‘ब्राह्मण बिझनेस काँक्लेव्ह कमिटी’तर्फे उपक्रम; व्यवसायाची वाटचाल : छोट्या पावलांपासून मोठ्या यशाकडे
Pimpaloli Crime News : पिंपळोली येथे रिक्षा चालकाला किरकोळ कारणावरून मारहाण
नवरात्रोत्सवात सप्तशृंगी गडावर खासगी वाहतुकीला बंदी असणार आहे. त्यामुळे नांदुरी ते सप्तशृंगी या मार्गावर फक्त एसटी बसच चालणार आहेत. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन यासाठी तब्बल २५० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
एसटी महामंडळाच्या या उपक्रमामुळे भाविकांना नवरात्रात सुरक्षित, सोयीस्कर आणि परवडणाऱ्या दरात देवदर्शन घेता येणार असून, ही सेवा भाविकांसाठी एक मोठा दिलासा ठरणार आहे.