Team My Pune City – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) छाननी पूर्ण झाल्यानंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखतींचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या मुलाखती ११ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर कार्यालयात घेण्यात येणार आहेत. आयोगाने परिपत्रकाद्वारे ही माहिती प्रसिद्ध केली आहे. ११ नोव्हेंबर रोजी सहयोगी प्राध्यापक, पंचकर्म (महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-अ) पदासाठी मुलाखत होईल.
Brahmin Community : आगामी निवडणुकांत ब्राह्मण समाजालाही संतुलित प्रतिनिधित्व मिळणार का?
१२ नोव्हेंबरला सहायक प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र (वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब) आणि सहयोगी प्राध्यापक, मूत्रशल्यचिकित्साशास्त्र (गट-अ) पदांसाठी उमेदवारांची मुलाखत होणार आहे.
१३ नोव्हेंबर रोजी सहायक प्राध्यापक, किरणोपचारशास्त्र (गट-ब) तसेच सहयोगी प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र (आयुर्वेदिक सेवा, गट-अ) आणि सहायक प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र (गट-ब) पदांसाठी मुलाखती ( MPSC) होतील.
१४ नोव्हेंबरला सहायक प्राध्यापक, अंतःस्रावशास्त्र (गट-ब) तसेच सहयोगी प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र व संस्कृत संहिता सिद्धांत (गट-अ) पदांसाठी मुलाखती होतील.२० नोव्हेंबर रोजी सहयोगी प्राध्यापक, संस्कृत संहिता सिद्धांत (आयुर्वेदिक सेवा, गट-अ) पदासाठी ( MPSC) मुलाखत होईल.
२१ नोव्हेंबरला सहयोगी प्राध्यापक, स्वस्थवृत्त (आयुर्वेदिक सेवा, गट-अ) पदासाठी मुलाखत होणार आहे.
२४ आणि २५ नोव्हेंबर रोजी सहयोगी प्राध्यापक, भौतिकशास्त्र (महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ, उच्च व तंत्रशिक्षण विभाग) पदासाठी मुलाखती होतील.
२५ ते २७ नोव्हेंबरदरम्यान सहयोगी प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र (वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ) पदासाठी मुलाखती घेण्यात येतील.आयोगाने स्पष्ट केले आहे की, उमेदवारनिहाय तपशीलवार कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर केला ( MPSC) जाईल.






















