Team My Pune City -दारू पाजण्यास नकार दिल्याच्या रागातून एका मजुरावर कड्याने (Moshi)हल्ला केल्याची घटना मोशी, पुणे येथे घडली. ही घटना शुक्रवार (१७ ऑक्टोबर) रोजी दुपारी साडे दोनच्या सुमारास ओम हॉटेलसमोर, मोशी मार्केटजवळ घडली.
या प्रकरणात रोशनकुमार गणेश चौधरी (३८, राजीवगांधीनगर, मोशी, मूळ गाव बेगुसराय, बिहार) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी करण पांडुरंग गवळी (२५, विनायकनगर कॉलनी नं.१, मोशी) याला अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र पप्पूसिंग हे जेवणासाठी ओम हॉटेलसमोर गेले असता आरोपीने त्यांच्याकडे “मला दारू पाज” अशी मागणी केली. फिर्यादीने नकार दिल्याने आरोपी संतापला आणि त्याने शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. त्यानंतर हातातील कड्याने फिर्यादीच्या डोक्याच्या मागील बाजूस प्रहार करून त्याला जखमी केले. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे पुढील तपास करीत आहे.