situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Moshi Kanya School : मोशी कन्या शाळेत विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी डिजिटल मतदान प्रक्रिया संपन्न

Published On:
Moshi Kanya School

विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणुकीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

Team My pune city – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सावित्रीबाई फुले कन्या शाळा, मोशी क्रमांक १०७ मध्ये ( Moshi Kanya School) शनिवार, दिनांक १९ जुलै २०२५ रोजी ‘दप्तरविना शनिवार’ उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. याच दिवशी, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी शालेय मंत्रिमंडळ निवडण्यासाठी एक अभिनव आणि यशस्वी डिजिटल मतदान प्रक्रिया आयोजित करण्यात आली.


शाळेच्या शिक्षिका अश्विनी सावळकर वाघमोडे यांनी विकसित केलेल्या विशेष सॉफ्टवेअरच्या मदतीने आणि शिक्षक संदीप भालेकर यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. हे डिजिटल तंत्रज्ञान वापरून पर्यावरणपूरक पेपरलेस मतदान राबवण्यात आले.

Alandi : पालिकेच्यावतीने चाकण चौक पुल परिसरातील खड्डे बुजवण्याचे काम सुरू; इंद्रायणी घाट परिसराची स्वच्छता

या उपक्रमाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मतदान प्रक्रिया विद्यार्थ्यांनीच राबवली. भारतीय संविधानाचे महत्त्व आणि देशातील निवडणूक प्रक्रिया कशी पार पाडली जाते, याची विद्यार्थ्यांना ( Moshi Kanya School) माहिती व्हावी यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये निवडणूक अर्ज भरण्यापासून, मतपत्रिका तयार करणे, विद्यार्थ्यांना विविध चिन्हांचे वाटप करणे, निवडणुकीचा प्रचार करणे, निवडणूक आचारसंहितेचे पालन करणे अशा अनेक बाबींचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी (१,२,३,४ ) आणि सुरक्षा कर्मचारी अशा विविध महत्त्वपूर्ण भूमिका अत्यंत जबाबदारीने पार पाडल्या. यामुळे विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रिया, मतदानाचे महत्त्व आणि त्याचे बारकावे प्रत्यक्ष अनुभवता आले.

या निवडणुकीत पाचवी ते आठवीच्या ( Moshi Kanya School) ६१२ मतदारांपैकी ४८३ विद्यार्थिनींनी आपला मतदानाचा हक्क बजावला. शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा अंबादास डांगे यांनी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. तसेच, मोल भालेकर यांनी कम्प्युटर ऑपरेटर म्हणून महत्त्वाचे काम सांभाळले. मुक्तार शेख, संतोष शितोळे आणि सोमनाथ शिंदे यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले.

Pawan Maval Journalists : पवन मावळ मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रवी ठाकर, उपाध्यक्षपदी अभिषेक बोडके, तर कार्याध्यक्षपदी विकास वाजे

मतदान प्रक्रिया डिजिटल असल्यामुळे निकालही लगेच जाहीर झाला. यामध्ये स्वरा सचिन शिंदे शाळेची मुख्यमंत्री म्हणून निवडून आली, तर सायली सारूक, राधिका पवार यांच्यासह एकूण १२ उमेदवार निवडून आले.

या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सजग नागरिकत्व आणि लोकशाही मूल्यांची दृढ रुजवात होण्यास मदत झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या शाळांमध्ये( Moshi Kanya School) असे सर्जनशील उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता, त्यांना व्यावहारिक आणि सामाजिक जाणीव असलेले जबाबदार नागरिक बनवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

याप्रसंगी सुनीता गीते (पर्यवेक्षिका) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. माया लोखंडे, पल्लवी सुरवसे, संतोष पन्हाळे, संतोष गवारे, उमेश सूर्यवंशी, नितीन गोडे आणि राजेंद्र पानसरे यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर ( Moshi Kanya School) कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रिया आनंददायी व शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य केले.


सजग नागरिक घडविण्यासाठी आमच्या शाळा सदैव कटिबद्ध आहेत. मोशी कन्या शाळेने राबवलेला हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. यामुळे विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच लोकशाही मूल्यांची आणि जबाबदार नागरिकत्वाची शिकवण मिळत असून इतर शाळांमध्येही( Moshi Kanya School) असेच उपक्रम राबविण्यात येणार आहेत.”

  • प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरीचिंचवड महापालिका


अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थी केवळ पुस्तकी ज्ञान घेत नाहीत, तर त्यांना व्यावहारिक आणि सामाजिक जाणीव असलेले जबाबदार नागरिक बनण्यास मदत होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचा हाच प्रयत्न आहे की, आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ( Moshi Kanya School) लोकशाही मूल्यांची रुजवात व्हावी व त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण विकसित व्हावेत.

  • किरणकुमार मोरे, सहाय्यक आयुक्त,पिंपरी चिंचवड महापालिका.

Follow Us On