Team MyPuneCity – भांडणात मध्यस्थी करणाऱ्याचा चावा घेतला. तसेच एका महिलेलाही दगडाने मारहाण केली. ही घटना लक्ष्मीनगर, मोशी येथे (Moshi Crime News) बुधवारी (दि. ७) घडली.
Pimple saudagar Crime News : सुट्टे पैसे न दिल्याने नातेवाइकाकडून खुनाचा प्रयत्न
ऋषीकेश ऊर्फ सोन्या बळीराम मोरे (वय २४, रा. लक्ष्मीनगर, मोशी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी उमेश भाऊसाहेब शिंदे (वय अंदाजे ३५, रा. लक्ष्मीनगर, मोशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला (Moshi Crime News) आहे.
Talegaon Dabhade : उदयसिंह निंबाळकर यांची मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्यपदी नियुक्ती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या शेजारी राहणाऱ्या आरोपी उमेश शिंदे याची त्याच्या पत्नीशी भांडण केले. या भांडणात फिय्रादी मोरे यांनी मध्यस्थी केली. या कारणावरून चिडलेल्या आरपी शिंदे याने रागाच्या भरात फिर्यादी यांचे लाइट मीटर तोडण्यास सुरूवात केली. त्याला प्रतिकार केल्याने आरोपी शिंदे याने फिर्यादीच्या आईल दगडाने मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्या हातास चावा घेऊन जखमी केले. एमआयडीसी भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत (Moshi Crime News) आहेत.