Team MyPuneCity –नवीन वीज कनेक्शन देण्यासाठी २५ हजारांची लाच घेतल्या प्रकरणी महावितरणच्या सहायक अभियंता आणि खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई गुरुवारी (५ जून) मोशी येथील भोसरी उपविभाग दोन या कार्यालयात करण्यात आली.
रामप्रसाद सुखदेव नरवडे असे अटक केलेल्या सहायक अभियंत्याचे नाव आहे. त्याच्यासह खासगी व्यक्ती शामलाल अशोकन (३५, मोशी) याला देखील अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मनेष शांताराम शेळके (३९, मोई, खेड) यांनी फिर्याद दिली आहे.
Chinchwad: “पर्यावरण दिनी ‘एक झाड एक आशा’ उपक्रम: आमदार अमित गोरखे यांचा विद्यार्थ्यांसह हिरवा संकल्प”
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेळके यांना मोहम्मद अरिफ खान यांच्या वतीने घरगुती विद्युत कनेक्शन पाहिजे होते. त्यासाठी शेळके यांनी महावितरणच्या भोसरी उपविभागीय कार्यालयात अर्ज केला. नवीन कनेक्शन देण्यासाठी शामलाल याने सुरुवातीला ३५ हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत शेळके यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागा (एसीबी) कडे तक्रार केली. एसीबीने बुधवारी आणि गुरुवारी महावितरणच्या भोसरी उपविभाग दोन या कार्यालयात सापळा लावला. तडजोड करून सहायक अभियंता रामप्रसाद नरवडे यांच्यासाठी २५ हजारांची लाच घेताना शामलाल याला रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एसीबीचे पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करीत आहेत.