Team MyPuneCity –मान्सूनबाबत आनंदाची बातमी आहे. मान्सून आज महाराष्ट्रात दाखल झाला आहे.यावेळी तब्बल 12 दिवस आधी मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून यंदा त्याने तब्बल 12 दिवस आधीच महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. राज्याच्या काही भागांमध्ये आज मान्सून दाखल झाला आहे.
Pune: गानवर्धनतर्फे नेहा महाजन यांना सुचेता नातू स्मृती युवा सतारवादक पुरस्कार जाहीर
केरळमध्ये मान्सून वेळेआधीच दाखल झाला होता. काल मान्सून केरळात दाखल झाला होता. त्यानंतर मान्सून महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी एक ते दोन दिवस जातील, असा अंदाज होता. मात्र, महाराष्ट्रात मान्सूनसाठी अत्यंत पोषक स्थिती असल्याने अवघ्या काही तासांमध्ये मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे.