Team My pune city – पी. ई .एस. एस च्या मॉडर्न प्री -प्रायमरी (Modern School) आणि प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कुल , यमुनानगर येथे आज ( दि. १३ रोजी) सकाळी बाळगोपाळांची दहीहंडी उत्साहात पार पडली .
या दिवशी शाळेतील विदयार्थी राधा , कृष्ण ,गोप गोपिका, या पारंपारीक वेशभूषेत आले होते . शाळेच्या मुख्याध्यापिका सौ . तृप्ती वंजारे व सर्व शिक्षकांच्या हस्ते दहीहंडीची (Modern School) पूजा करण्यात आली . सौ. लीना पगारे ह्यांनी मुलांना श्रीकृष्ण जन्माष्टमी ची कथा सांगून विद्यार्थ्यांना श्रीकृष्णाच्या दहीहंडीच्या गंमतीजमतीसुध्दा सांगितल्या . बालचमूंनी तीन ते चार थर रचून अतिशय जोमाने व उत्साहात दहीहंडी फोडली . नंतर मुलांनी गोविंदा आला रे आला, मच गया शोर सारी नगरी रे,या गाण्यांवर नाचून खूप मजामस्ती केली .
Pimpri Chinchwad Crime News 13 August 2025 : बँकेत बनावट नोटा जमा करण्याचा प्रयत्न
या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन श्यामकांत देशमुख , व शवंत कुलकर्णी ,शाळेचे व्हीजीटर अतुल फाटक आणि शशिकांत ढोले मुख्याध्यापिका तृप्ती वंजारे यांचे (Modern School) अमुल्य मार्गदर्शन लाभले.
Golden Rotary : गोल्डन रोटरीच्या तिरंगा रॅली उत्स्फूर्त प्रतिसाद
या कार्यक्रमाचे संयोजन नमिता घोलप व ज्ञाती चौधरी ह्यांनी केले.संस्थेचे कार्याध्यक्ष गजानन एकबोटे सर व सहकार्यवाह ज्योत्स्ना एकबोटे मॅडम,उपकार्यवाह निवेदिता एकबोटे यांनी या बालचमुंचे खूप कौतुक केले . सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने दहीहंडी (Modern School) अतिशय उत्साहात पार पडली .