Team MyPuneCity – पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर ( Mock Drill Operation Abhyas) भारतात ८४० जिल्ह्यांपैकी २४४ जिल्ह्यांमध्ये ‘ऑपरेशन अभ्यास’ अंतर्गत मॉक ड्रिल केले जाणार आहे. त्यात महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल होणार असून त्यातील आठ जिल्ह्यांत बुधवारी (७ मे) मॉकड्रील झाले. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील मनपा भवन येथे सायंकाळी मॉकड्रील झाले.

Chinchwad Fraud News : सरकारी ठेकेदार असल्याचे सांगत दीड कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल
सायंकाळची चार वाजताची वेळ. पिंपरी-चिंचवड मनपा भवनामध्ये ( Mock Drill Operation Abhyas) कामानिमित्त आलेल्या नागरिकांची वर्दळ, मनपा भवन मध्ये काम करणारे शेकडो कर्मचारी कामात व्यस्त असताना अचानक बॉम्ब हल्ल्याचे तीन आवाज आणि गोळीबार झाल्याचा आवाज कानावर पडताच सर्वांची धावपळ उडाली. मनपाच्या सुरक्षा विभागाकडून हवाई मार्गे हल्ला झाला असल्याची पुष्टी करण्यात आली आणि तात्काळ पोलीस, अग्निशमन विभाग, वैद्यकीय विभागाला कळविण्यात आले. अवघ्या दोन मिनिटांमध्ये अग्निशमन दलाची तीन वाहने आणि एक ब्रीदिंग अप्रॅटस (बीए) व्हॅन, एक ब्रांटो स्काय लिफ्ट मनपा भवनात दाखल झाले.

Maval : औद्योगिक शिक्षण मंडळाच्या तीनही महाविद्यालयांचा बारावी परीक्षेत डंका
मनपा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर धूर पसरला असून काही लोक जखमी झाले असून काहीजण अडकले असल्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीमधून सर्वांना बाहेर काढले. सर्वजण बाहेर आल्यानंतर जवानांनी प्रत्येक खोलीत जाऊन कोणी अडकले नसल्याची खात्री केली. त्यानंतर इमारतीमधून चार नागरिकांना ब्रांटो स्काय लिफ्टच्या मदतीने रेस्क्यू करण्यात आले. दोघांना रोप लावून रेस्क्यू केले. तर चौघांना स्ट्रेचरवरून रेस्क्यू करत रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलच्या दिशेने रवाना ( Mock Drill Operation Abhyas) केले.
या मॉकड्रील मध्ये आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलीस, सुरक्षा विभाग, गृह मंत्रालय,अग्निशमन विभाग, वैद्यकीय विभाग आणि सिव्हिल डिफेन्स या विभागांनी सहभाग घेतला. युद्धाच्या परिस्थितीत शहरातील यंत्रणांची कशी तयारी आहे, याचे प्रात्यक्षिक या मॉकड्रील द्वारे घेण्यात आले. ४.२७ वाजता मॉकड्रील पूर्ण झाले आणि सर्व कर्मचारी पुन्हा आपल्या दालनात परतले. दरम्यान, अचानक ओढवलेल्या या परिस्थितीमुळे अनेकजण घाबरले असल्याचे पाहायला मिळाले.
विजय दळवी हे मनपामध्ये कामानिमित्त आले होते. दळवी म्हणाले, “मी तिसऱ्या मजल्यावर असताना अचानक धूर पसरला आणि अडकून पडलो. धूर मोठ्या प्रमाणात झाल्याने श्वसनास त्रास होऊ लागला. एवढ्यात काही जवान माझ्यापर्यंत आले आणि त्यांनी मला रेस्क्यू करून खाली आणले. लिफ्ट बंद झाल्याने पायऱ्यांवरून खाली आणण्यात आले. अतिशय तत्परतेने सर्व यंत्रणांनी ( Mock Drill Operation Abhyas) प्रतिसाद दिला.”
रासायनिक हल्ल्याचीही सज्जता
मागील काही महिन्यांपूर्वी पिंपरी-चिंचवड मनपा भवनात मॉकड्रील करण्यात आले होते. त्यावेळी इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. तो धूर लवकर बाहेर पडला नव्हता. अशाच प्रकारे रासायनिक हल्ला झाल्यास त्या धुरामध्ये अडकून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता लक्षात घेत मनपा भवनात धूर तात्काळ बाहेर काढण्यासाठी यंत्रणा बसवण्यात आली आहे. ही यंत्रणा सक्रिय करून सर्व धूर काही क्षणात बाहेर काढण्यात आला. तसेच पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागात ब्रीदिंग अप्रॅटस (बीए) व्हॅन आहे. त्यामुळे रासायनिक हल्ल्यात देखील नागरिकांना मदत करणे शक्य होणार ( Mock Drill Operation Abhyas) आहे.