पावसाळी अधिवेशनात बाबाजी काळे यांची खेड तालुक्याच्या विविध विकासकामांसाठी विकास नीधीची मागणी
Team My pune city –विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. खेड तालुक्यातील आमदार बाबाजी काळे यांनी काल बुधवार दिनांक ९ जुलै रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळात लक्षवेधीद्वारे खेड तालुक्यातील आळंदी, चाकण, राजगुरूनगर नगरपरिषदामंध्ये अग्निशमन सेवेत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचारी यांना विमा संरक्षण देऊन कायम स्वरूपी करण्यात यावे. तसेच इतर ग्रामपंचायत माध्यमातून , जे नगरपरिषद झाल्यानंतर काम करत आहे, अशा चाकण खेड येथील कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्यात यावे ,अशी मागणी ( MLA Babaji Kale) यावेळी त्यांनी केली.
Kondhwa Crime News : मेहुण्याने केला दाजीच्या तिजोरीवर हातसाफ ,अडीच लाखाच्या ऐवजासह मेहुणा जेरबंद
तसेच त्यांनी यावेळी वाहतूक समस्या सोडवण्यासाठी पुणे मुबंई रस्त्याला समांतर रस्ता, पीएम आर डी मार्फत विकास आराखडा अंतिम व्हावा.पीएम आर डी च्या माध्यमातून शहरातील रस्ता,वाहतूक कोंडी समस्या सोडवण्यासाठी प्रस्थावीत मेदनकर वाडी येथील,३६ मी. बायपास रस्ता,नाणेकर वाडी येथील १५ मीटर ,तळेगाव चाकण महामार्ग हिंगणे चौक,चाकण औद्योगिक वसाहत टप्पा क्रमांक ३ रस्ता,येथील लवकर भूसंपादन होऊन तेथील कामे व्हावीत.
खेड तालुक्यातील सर्व रस्ते पावसामुळे दुरावस्थेत सदर दुरुस्ती साठी मोठ्या प्रमाणात निधी मिळावा.पूर व आपत्त कालीन परिस्थिती साठी 100 कोटी निधी अपेक्षित,वाकी फाटा ,काळूस ,भोसे,एम डी आर रस्त्यांवरील काळूस गावा जवळील पूल धोकादायक झाला असून कधी ही अनुचित प्रकार घडू शकतो. ग्रामस्थ नागरिक यांनी आंदोलन केली ( MLA Babaji Kale) आहेत .
Dehuroad Cantonment : देहूरोड कॅन्टोन्मेंट परिसरातील विकासाला चालना देणार — मुख्यमंत्री
काही दुर्घटना हाऊ नये म्हणून मंत्री महोदयांना विनंती सदर पुलाला 10 ते 11 कोटी रु.निधी मंजूर व्हावा.इंद्रायणी नदी प्रदूषण कमी करण्यासाठी पी एम आर डी ने ५०० कोटीचा प्रस्ताव सादर केला आहे. तो लवकर मंजूर व्हावा.ती कामे व्हावीत. सांस्कृतिक भवन ,बैलगाडा घाट यासाठी निधी मिळावा. अश्या विविध विकास कामांच्या मागण्या यावेळी बाबाजी काळे यांनी ( MLA Babaji Kale) केल्या.